मशागत
००० मशागत ०००
शेतात भरघोष पीक येण्यासाठी शेतीची मशागत करावी लागते. तशीच शाळेची भरभराट व्हावी. प्रगतीची शिखरे गाठावी यासाठी शाळेची मशागत करावी लागते. दोन्हीचे स्वरूप मात्र भिन्न आहे. चार पाच वर्षांपूर्वी बादेवाडी शाळेत नविन इमारतीचे बांधकाम सुरु होते. बांधकामासाठी जेसीबीने खड्डे काढण्यात आले. यावेळी जागेच्या अडचणीमुळे शाळेत जेसीबी आणताना मोठी कसरत करावी लागली. खड्यांतील माती जागेअभावी शाळेच्या मैदानातच टाकण्यात आली. त्यामुळे मैदानात दोन ते चार फुटाचे मातीचे ढिग तयार झाले. सोबतीला दगडे होतीच.
शाळेच्या बंदिस्त आवारामुळे मुलांचे खेळणे बागळणे बंद झाले. काय करणार ? माती टाकायला दुसरा पर्यायच उपलब्ध नव्हता. लहान मुले मातीच्या ढिगा-यांवरुन चढता उतरताना घसरुन पडु लागली. मुलांना खरचटण्याचे प्रमाण वाढले. समस्येत भरीस भर म्हणून की काय , मातीमुळे मुता-यांची दारेही बंद झाली. ह्या समस्या सोडवण्यासाठी मुले व आम्ही दररोज माती काढत होतो. परंतु मातीपुढे आमचे प्रयत्न तोकडे ठरत होते. मुलांना खरचटणे नित्याचेच होवून बसले. यावर उपाय म्हणून परत जेसीबी आनायचा तर बंदिस्त जागेमुळे रस्ता नव्हता. शेवटि तातडीचा उपाय म्हणून मजुरांकरवी माती काढण्याचे ठरले . ठरल्याप्रमाने मजुरांनी माती काढलीही. परंतु दोन दिवसातच त्यांनी हात टेकले.अवकाळी पावसाने व नित्याच्या वर्दळीने माती पाय रोवून बसली होती.
आता समस्या अधिकच रौद्ररुप धारण करू लागली.त्यामुळे यावर चर्चा करणेसाठी गावातील निवडक ग्रामस्थांना बोलावूण चर्चा करण्यात आली. चर्चेअंती मैदानातील माती औताने नांगरुन श्रमदानाने माती शाळेशेजारच्या ओढ्यात टाकण्याचे ठरले.
ठरलेल्या दिवशी , ठरलेल्या वेळी निवडक ग्रामस्थ बैलं , औत तर मुले खोरं , पाटि घेवून आले. ग्रामस्थांनी शेत नांगरावे तसे मैदान नांगरून माती मोकळी केली. मुलांनी खो-यानं माती पाटित भरत " साथी हात बढाना , एक अकेला थकजाएगा , मिलकर बोझ उठाना " या ओळींप्रमाणे मैदान मोकळे केले. गोड फळे खायची असतील तर कुणीतरी झाड लावावे लागते. नाही का ?.............गुलाब बिसेन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा