रीटेक
००० रीटेक ०००
विज्ञानयुगात दररोज नवनविन शोध लागतायत. तंत्रज्ञानात दररोज नवनवीन भर पडतेय . गरज हि शोधाची जननी या उक्तीप्रमाने दैनंदिन जीवन अधिक सुकर व्हावे हा त्यामागचा हेतू आहे. असे असले तरी या तंत्रज्ञानाचा उपयोग कोण , कसा आणि किती प्रमाणात करतोय यावर त्या तंत्रज्ञानाचे यश अवलंबून असते.
मोबाईल क्षेत्रात स्मार्टफोन आला आणि मानवी जीवनच बदलून गेलं. मोबाईलच्या कॅमे-यातून जीवनातील प्रत्येक क्षण टिपून ठेवण्याचा जो तो प्रयत्न करताना दिसतोय. त्यात सेल्फिनेतर सगळ्यांनाच वेड लावलय. सामांण्यांपासून ते उच्चवर्णीयांपर्यंत सर्वांना सेल्फीचा मोह आवरता आवरत नाही. परंतु सेल्फिच्या अतिरेकाने अनेकांचा जीव घेतलाय. असा कटु प्रसंग कुणाच्याही वाट्याला न येवो.
प्रसंग क्र. १ वळणावळणाच्या , मंद उताराच्या रस्त्याने मी चाललो होतो. अचानक एका वळणावर माझ्या समोरच्या बाजूने एक दुचाकी येताना दिसली. दुचाकीवर तीन तरूण बसले होते. दुचाकी वळणावरुन घसारुला लागताच , दुचाकी चालकाने अचानक दोन्ही हात सोडून खिशात घातले. हे बघुन माझ्या अंगावर काटाच उभा रायला. खिशातून उजव्या हाताने मोबाईल काढला. सुरु गाडीवरच मोबाईल उघडला. तिघांचा सेल्फि घेतला आणि आले तसे सुसाट निघुन गेले.
प्रसंग क्र. २ एक तरुण आणि तरुणी दुचाकीवर स्वार होवून वा-याच्या वेगाने सुसाट चालले होते. दुचाकी वा-याशी स्पर्धा करत पुढे जात होती.एवढ्यात दुचाकीवरील युवतीने पर्समधील मोबाईल काढला . तरूणाच्या गळ्यात दोन्ही हात घालुन सुरु गाडीवरच पुढच्या बाजुने सेल्फी घेवू लागली. चालु गाडीवर सेल्फी चांगला येत नसल्याने , पुन्हा पुन्हा रिटेक सुरु होते. हा प्रकार मुख्य रस्त्यावर दहा पंधरा मिनीटे सुरु होता.
वरील दोन्ही प्रसंगात सुदैवाने कुणालाही अपघात किंवा कुठलीही इजा झाली नाही परंतु तंत्रज्ञानाच्या नको त्यावेळी आणि नको तिथे वापराने ही मंडळी दुस-यांचे जीव मात्र धोक्यात घालत आहेत. याचे जरासुद्धा भान या मंडळीला नाही. मोबाईलमधील सेल्फिचा पुन्हा पुन्हा रिटेक घेता येईल . परंतु आयुष्याचा रिटेक परत घेता येत नाही , हे या मंडळीला कोण समजावून सांगेल ! ............ गुलाब बिसेन ( ९४०४२३५१९१ ).

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा