पानगळ

०००पानगळ ०००

    सकाळी थंडीची मंद झुळुक आणि सूर्य डोक्यावर येताच सुरु होणारी पानगळ ! पानांचं ओझं झाल्यासारखी झाडे अंगावरील पानांना झटकुन देतात. ही पानगळ झाडांना नविन जिवन , नविन आनंद देते. जुन्या पानांना सोडण्याचे दु:ख पदरात घेवून नव्या पानांचे स्वागत करायला ही मंडळी सरसावते. आजच्या दु:खात उद्याचे सुख दडलेले असते. जुण्याला सोडल्याशिवाय नव्याचे सुख कसे मिळेल ?
    झाडांचे रंगरूप बदलणारी पानगळ ! सगळीकडे उत्साही , आनंदी वातावरण ! झाडाझाडावर, पानापानावर नविन बहार . पानाफुलांची रंग उधळायसाठी लागलेली स्पर्धा , पाखरांची फुलांचा मकरंद चाखायसाठी चाललेली  धावपळ मनाला हर्षून टाकते.
     पानगळ नविन जिवण देते झाडांना........आनंद देते सृष्टिला.......विचार देते कवीला......सुगंध देते भुंग्याला......रंग देते फुलांना........निवारा देते पाखरांना.......शितलता देते वाटसरुला.
         निस्पर्ण झालेल्या वृक्षाचे ओंगळवाने रुप फुलल्या नंतर सर्वांनाच हवेहवेसे वाटते . फुललेला पळस ....आंबा....शिवर....मोह....गुलमोहर स्वागताला पायघड्या घालुन सज्ज असतात.पाखरांचे संसार याच काळात फुलतात. या सृष्टितील आपले जिवनकार्य पूर्ण झाले की जगाचा निरोप घेवून दुस-यांना फुलायची , बहरायची संधी देण्याचा निसर्ग नियमाची आठवण ही पानगळ करुन  देते.............गुलाब बिसेन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा