फरहानचा गाडा
००० फरहानचा गाडा ०००
सकाळचे कोवळे उन्ह पडताच घराशेजारची बालगोपाल आपापली खेळणी घेवून उन्हात खेळु लागली. कुणी सायकल फिरवू लागला . कुणी बॅटबाॅल , कुणी तीन चाकी सायकल तर कुणी बिनसाहीत्याची खेळु लागली.
एवढ्यात शेजारी राहणारा फरहान कसलेसे खेळणे घेवूण आला. पाच सहा वर्षांचा फरहान स्वभावाने मृदूभाषी ,कायम हसतमुख . फरहानच्या जवळील जरा वेगळे खेळणे बघुन सर्व मुलांनी आपली खेळणी आणि खेळ सोडुन त्याच्याभोवती एकच गलका केला. कायम दुस-या मुलांच्या मागेपुढे करत खेळणा-या फरहानला या गलक्याने खुपच आनंद झाला. खेळणे बघण्याच्या उत्सुकतेपोटी त्याच्याभोवती गलका केलेल्या त्याच्या मित्रांना त्याने तेवढ्याच उत्सफूर्तपणे आपले खेळणे दाखवत प्रतिसाद दिला.
फरहानचे खेळणे कोणत्याही दुकानातून विकत घेतले नव्हते तर लोखंडी सळ्यना वेल्ड करुन ते बनवले होते. परंतु या साध्या खेळण्याने महागडी खेळणी खेळणा-या मुलांना भुरळ घातली.
ते खेळणे होते..... साध्या लोखंडी सळ्यांना वेल्डकरून बनवलेला "गाडा". दोन चाके , एक दांडा आणि एक स्टेअरिंग असलेले हे खेळणे !
फरहानने अगदि आनंदात सर्व मुलांना हा गाळा हाकायला देत खेळाचा आनंद घेतला. महागड्या खेळण्यांना मागे टाकत मुलांना भूरळ घालणारा हा साधा " गाडा " लाखमोलाचा आनंद देवून गेला.......... गुलाब बिसेन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा