खडु

॰॰॰॰॰ खडु ॰॰॰॰॰

  घड्याळात चारचे ठोके होताच सर्व मुले शारीरिक शिक्षणाच्या तासासाठी मैदानात जमली. मी व माझे सहकारी प्रात्यक्षिक घेवू लागलो. एवढ्यात एक सत्तरीतील आजी पाय-या चढुन शाळेत येताना दिसली. ती तडक माझ्याजवळ आली. त्यांच्याशी संवाद साधत मी म्हणालो , " आजी , काय चाललय ? " आजी : काय नाही सर. तुमच्याकडचं काम होतं . मी : काय काम होतं आजी ?"  आजी : " दोन खडु पायजेत ." मी : खडु ! कशासाठी ? आजी : म्हैस चिपाडतीया. तिला खडुचा तुकडा लागवडीतनं दिल्यावर थांबतया." मी: डाॅक्टरांना नाही दाखवलं म्हशीला ? "  आजी : डाक्टराच्या अवसदापेक्षा नामी अवसद हाय खडु ."  
 शाळेतून गावातील अनेक  जवळजवळ सर्वच मानसे जनावरांसाठी खडु नेतात. कुणी म्हशीसाठी , कुणी गायीसाठी तर कुणी शेळ्या मेंढ्यांसाठी. या जनावरांना लघवीतून पांढरा द्रव  जाण्यावरचा खडु हा घरगुती परंतु रामबाण उपाय. शिवाय शाळेतुन खडु मिळतोय तो निशुल्क मोफत. या खडुमुळे का असेना पण ज्यांची मुले शाळेत नसल्याने शाळेकडे न फिरकणारी मंडळीही शाळेच्या पाय-या चढतो. साहजिकच त्याची नाळी शाळेशी जोडली गेली आहे ती फक्त या खडुमुळे ! ..................गुलाब बिसेन ( 9404235191 )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा