सु विचारांचा सुगंध

००० सु ' विचारांचा सुगंध ०००

        शाळेला असताना गुरुजींनी व आईवडीलांनी दिलेले चांगले विचार आणि त्यांनी केलेले सुसंस्कार यातून सुविचारांची माझ्या मनात मांदियाळी भरायची. सुविचारांच्या सुगंधाने मला असे काही मोहीत केले कि , मला सुविचारांचा संग्रह करण्याचा छंदच लागला. मग वाचनात येणारे सुविचार मी संकलीत करु लागलो. कधी वाचलेल्या पुस्तकातील तर कधी शाळेच्या भिंतीवरील , कधी गुरूजींच्या वाणीतून आलेले तर कधी वर्तमानपत्रातील मजल दरमजल करत शालेय जीवनात मी १००० सुविचारांचा संग्रह केला.

      आज जागतिक मराठी भाषादिनानिमित्त अडगळीत पडलेल्या परंतु सांभाळुन ठेवलेल्या सुविचारांच्या दोन्ही वह्या काढल्या आणि शाळेत घेवून आलो. शाळेत असताना हे सुविचार भविष्यात कुणाच्या उपयोगी पडेल असे मनातही आले नव्हते.

        मराठी भाषेचा गोडवा तिच्या अनेक रुपांतून अखंड वाहत आहे. आज मराठी भाषा दिनानिमित्त मी शालेय जीवनात संकलीत केलेला सुविचारांचा वसा माझ्या विद्यार्थ्यांच्या हातात सोपवताना खुप आनंद होतोय. सुविचारांचा हा सुगंध भावी पिढिद्वारे वर्षानुवर्षे असाच दरवळत राहील................गुलाब बिसेन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा