रस्ता आणि प्रवास

रस्ता आणि प्रवास

प्रवास........ प्रत्येकाच्या वाट्याला कमी अधिक प्रमाणात येतोच. कुठल्या न कुठल्या कारणाने प्रत्येकाला प्रवास करावा लागतो. प्रवासाला निघालेला प्रवाशाला रस्त्याने प्रवास करत असतानाना कधी चढ तर कधी उताराचा सामना करावा लागतो. प्रवासात अनोळखी रस्ता असल्यास तो कसा असेल याचा कुणालाच पत्ता नसतो. अनोळखी मार्गावर कुणी ओळखीचा भेटेल हेही सांगणे कठीणच ! असा अनोळखी रस्ता कधी काटाकुट्यांनी भरलेला तर कधी शितल छायेचाही असू शकतो.

सगळेच रस्ते काही वळणावळणाचे नसतात. तसेच सगळेच रस्ते सरळही नसतात. वळणदार रस्त्यावर चालकाचे कसब पणाला लागत असते. वळण संपले कि सरळ रस्ता लागतोच लागतो. कधी कधी रस्ता बहुपदरीही असतो. त्यावर कधी वळण , कधी खाचखडगे तर कधी सरळ !

मानवी जिवनही असे अनेक पदरी रस्त्याप्रमाणे आहे. जिवनाच्या वाटेवर अनेक खाचखळगे , वळणे येतच असतात. अशावेळी मानसाच्या धैर्याचे कसब पणाला लागते. रस्त्यात येणारे खाचखळगे कायमच येत नसतात. या खाचखळग्यांना धैर्याने तोंड दिलं कि चांगला रस्ता सापडतो आणि जिवन प्रवास अधिक सुखकर होतो.

वाट सरळ असो वा वळणावळणाची तिला कुठलीतरी दिशा नक्कीच असते. एका ठिकाणी सुरू झालेला वाटेचा प्रवास हा कुठल्यातरी दिशेला छेदत असतो. मानवी जिवणालाही अशा वाटेची गरज असते. माणसाने केलेल्या कर्म आणि प्रयत्नांप्रमाणे जो तो ज्या त्या दिशेला सरकत जातो. जिवण प्रवास वेगवेगळी वळणं घेत पुढे जसा जसा सरकत जातो. तसाच तो सरळही जातच असतो.

कधी सरळ तर कधी वळणं. आनंदाने जगणारी व्यक्ती सरळ रस्त्यासारखाच वळणाच्या रस्त्याचाही आनंद घेतो. मात्र दु:खी भावनेने जगणारा माणूस सरळ वाटेणेही उलट्या करतो. अशा माणसाला उलट्यांसाठी वळणाच्या रस्त्याची गरज नसते. त्यामुळे रस्ता सरळ असो वा वळणाचा त्यावर प्रवासाचा आनंद घेणे महत्वाचे आहे.......
............ गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा