माया लावणारी माणसं
## माया लावणारी माणसं ##
एका शिक्षकाच्या जिवनामध्ये विद्यार्थ्यांचं अस्तित्व जसं कधीही अस्ताला न जाणार्या सूर्यासारखं असतं , अगदि तसच पालकांचही असतं. शाळेचा संबंध केवळ विद्यार्थ्यांशीच नसतो. तर तो गावाशी आणि तेथील प्रत्येक पालकांशीही असतो. शाळेच्या गावात शिक्षक म्हणून वावरताना विद्यार्थी आणि पालक यांचा सारखा संपर्क येत असतो. यातून विद्यार्थी विकास आणि शाळाविकासाचा मार्ग प्रशस्त होत जातो. यातूनच काही न विसरता येणारी नातीही निर्माण होतात. या नात्यांना कोणतीही उपमा , नाव देता येत नाही.
बादेवाडी / वेखंडवाडी सारख्या डोंगरकपारीतील शाळेत काम करत असताना अनेक चांगल्या , शुद्ध मनाच्या व्यक्तींचा सहवास मला लाभला. यामुळेच असेल कदाचित हि माणसे मला हाक मारताना बर्याचदा मी त्यांच्या गावच्या शाळेतील शिक्षक आहे हे विसरून जावून मी जणू त्यांच्या घरातील सदस्य असल्यासारखे मला वागणूक द्यायचे. हे त्यांचे निरपेक्ष प्रेम मला सर्व गोष्टिंपेक्षा श्रेष्ठ वाटते.
अशाच एक आजी आपल्या नातवंडांच्या अभ्यासासंबधी अडचणी घेवून बर्याचदा शाळेत यायच्या. शाळेत आल्यावर आपल्या नातवंडांचा अभ्यास झाला नाही म्हणून गुरूजींनी रागावू नये तर कधी नातवंडांना सुट्टि पाहिजे म्हणून नातवंडांची बाजु मांडण्यासाठी शाळेत यायच्या. येता जाता माझी विचारपूस करायच्या. महेश आणि सौरव हि त्यांची दोन्ही नातवंड माझ्याकडे शिकायला होती. पुढे माझ्या वर्गातून पुढच्या वर्गात गेल्यावरही त्यांच्या अडचणी घेवून येणारी आजी मात्र माझ्याकडेच यायच्या. तेव्हा मी त्यांना त्यांच्या वर्गशिक्षकांना भेटायचा सल्ला दिला कि त्या म्हणायच्या , " सर , माझी त्यांच्याशी ओळख नाही, तुम्हीच सांगा की!"
एकदा एप्रिल महिण्यात सूर्य आकाशात तडपत असताना मी सकाळची शाळा आटोपून घरी विश्रांती घेत होतो. एवढ्यात अचानक दाराचा ठक SS ठक असा आवाज आला. आमच्या सौ. दार उघडायला पुढे झाल्या. सौ.नी दार उघडताच बाहेरून आवाज आला , " बिसेन सर इथेच राहत्यात काय ?" सौ.नी त्यांना आत यायला सांगितले. डाॅक्टरकडे आलेल्या या आजी माझी खोली माहित नसताना , दहा जणांना माझा पत्ता विचारत , भर उन्हात फक्त आम्हाला भेटायला आल्याचे बघुन मला आश्चर्यच वाटले. आजींनी सोबत बाळासाठी बिस्किटं आणली होती. मी आजीला चहा देवून , जेवायला सांगितलं. परंतु त्यांनी स्पष्ट नकार दिल्याने माझा नाईलाज झाला. तासाभराच्या मुक्कामानंतर आजींनी आमचा निरोप घेतला.
अशेच मी एकदा मिला भेटायला त्यांच्या शेतात जात असताना शेतात पिकाची राखन करत बसलेल्या आजीला मी गाडीवरून जाताना दिसलो. मला बघताच आजीने जोर जोरात आवाज दिला. परंतु मला आवाज ऐकायला न आल्याने , मी परत यायची त्या रस्त्यावर बसून वाट बघु लागल्या. थोड्या वेळाने मी परत येताना बघुन त्यांनी माझा रस्ताच अडवला.
" सर , बदली झाल्यापासनं पाक इसरलायसा. कवातर ईत जावा." आजी बोलत होत्या.
" होय." मी आपला मान हलवत म्हणालो.
एवढ्यात आजीने त्यांच्या शेतातील तोडुन ठेवलेल्या भेंड्या त्यांच्या पदरातून बाहेर काढत ,
" कशात नेणार हायसा भेंड्या ? तुमच्याकळं पिशवी दिसंना. माझ्याकळंपण पिशवी नाही."
" द्या माझ्या रूमालात " खिशातील रूमाल काढत मी म्हणालो. हातातील रूमाल मी गाडीच्या शीटवर ठेवला. आजीने पदरातील सर्व भेंड्या त्यात बांधुन दिल्या. एका आजीचे माझ्यावरील हे निस्वार्थ प्रेम बघुन मला गहिवरून आले. क्षणार्धात माझे डोळे पाणावले. परंतु डोळ्यांतील पाणी डोळ्यांतच लपवत मी जड अंतकरणाने आजींचा निरोप घेतला................ गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा