शाळा..... नव्हे माझी प्रयोगशाळा
शाळा.....नव्हे माझी प्रयोगशाळा
विद्यामंदिर बादेवाडी शाळा , माझ्या आयुष्यातील एक सोनेरी पान. मसाई पठाराच्या कुशीत वसलेलं एक छोटसं टुमदार गाव. माझ्या नोकरीची सुरूवात या छोट्याशा गावातील छोट्याशा शाळेतून झाली. सह्याद्रिच्या कुशीत , मसाई पठाराच्या पायथ्याशी वसलेल्या या छोट्याशा गावात तीन खोल्यांची विद्यामंदिर बादेवाडी ही छोटिशी जिल्हा परिषदेची इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतची शाळा. शाळेत चार वर्ग आणि दोन शिक्षक. प्रत्येकाने दोन दोन वर्ग सांभाळायचे. नोकरीची सुरूवातच अशा दुर्गम भागात झाल्याने आणि पूर्वानुभव पाठिशी नसल्याने पावला पावलावर परीस्थितीशी झगडावे लागले. चुकांमधुन शिकावे लागले. काम करत असताना हातून अनेक चुका होत होत्या पण त्या चुका पुढच्यावेळी सुधारत मार्गक्रमण करत गेलो. नोकरीच्या सुरूवातीला सर्व गोष्टि नविनच असल्याने प्रत्येक नविन काम करून बघणे , यशस्वी झालेल्या गोष्टिंची पुनरावृत्ती करत विद्यार्थ्यांमध्ये रूजवणे , या कारणाने हि शाळा माझ्यासाठी एक प्रयोगशाळाच ठरली.
या प्रयोगशाळेत मी रोज नवनविन प्रयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यावर करत होतो. कधी मुलांच्या अभ्यासावर तर कधी त्यांच्या वागण्या बोलण्यावर. कधी अंगवळणी पडलेल्या चुकिच्या सवयींवर तर कधी वैयक्तीक स्वच्छतेवर. मुलांची केस , नखे कापण्यापासून ते नाकातला शेंबुड पुसेपर्यंत. इंग्रजी वाचन लेखनापासून मैदानातील दगडं काढण्यापर्यंत सर्वच कामे मी मुलांच्यासाठी , मुलांसोबत करत गेलो. दिवस भरभर जात होते. बघता बघता माझी नोकरीची तान वर्षे पूर्ण झाली. त्याचवर्षी माझे शाळेतील अडचणींची अधिक जाण असणार्या माझ्या ज्येष्ठ सहकार्यांनी शाळेत पाचवीचा वर्ग उघडुया असे मला सुचवले. माझ्यापेक्षा त्यांना तेथील परिस्थितीचा अधिक अभ्यास होता. गावातील मुले ४ थी पर्यंत गावातील आमच्या शाळेत शिकायचे. पुढे पाचवीचा वर्ग गावापासून चार पाच किलोमिटर अंतरावर. त्यात जायला रस्ता नाही. पायवाटेने पायपिट करून चालत जावे लागे. रस्त्यात दोन ओढे लागायचे. पावसाळ्यात ओढ्यांना पूर आला कि मुले महिनाभर सक्तीच्या रजेवर घरी बसून राहायचे. बाकि दिवसात शाळेला जाताना डोंगर उतरायचा आणि घरी परत येताना डोंगर चढायचा. या रोजच्या हेलपाट्यात मुलांचे मोठे हाल व्हायचे. त्यामुळे निम्मी मुले वर्षादोन वर्षातच शाळेला रामराम ठोकायचे.
शाळा सोडुन घरात बसून गरीब आईवडीलांना कसे परवडणार ? मग कोवळ्यावयातच मुलांना शेतीकाम , हमाली अशी कामे लावली जायची. तर काही मुले कुठेतरी भरकटत राहायचे. लहान वयात योग्य दिशा न मिळाल्यामुळे अनेक तंबाखु , दारूच्या नसेत गुरफटायची. मुलिंची अवस्था तर मुलांपेक्षा बिकट ! मुली घरी बसून काय करणार ? मग कोवळ्या वयातच त्यांचे लग्न लावून त्यांना संसाराला जुंपले जायचे. या सर्व दुष्टचक्रातून मुलांची सुटका करण्याचा एकच मार्ग आम्हाला दिसत होता. तो म्हणजे गावातच मुलांना सातवी पर्यंतचे शिक्षण देणे. तसा मनोगत माझे सहकारी वेळोवेळी मला बोलुन दाखवत होते. मलाही ते सगळे पटत होते. त्यामुळे आम्ही दोघांनी मिळुन या शाळेत इयत्ता पाचवीचा वर्ग उघडण्याचे ठरवले. आणि जुन २०१० मध्ये पाचवी चा वर्ग सुरू केला. या वर्गात सोळा विद्यार्थी शिकु लागले. मुलांची पायपीट कमी करण्याच्या दृष्टिने आम्ही केलेल्या या प्रयत्नांना गावकर्यांनी मोठ्या दिलाने सहकार्य केले. गावातील सर्व मुले मुली सुशिक्षित व्हावीत असे गावकर्यांनाही मनोमन वाटतच होते. यावेळी प्रशासनाचीही मोलाची साथ आम्हाला लाभली.
जूनमध्ये सुरू झालेल्या वर्गाला जेमतेम सहा सात महिने झाले असताना माझ्या सहकार्यांच्या बदलीचा आदेश येवून धडकला. त्यामुळे ध्यानी मनी नसताना शाळेची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर येवून पडली. गावकर्यांची गरज आणि लहान मुलांची पायपीट थांबवण्याचा उचललेला विडा त्यामुळे आता हाती घेतलेले कामातून माघार घेणे शक्य नव्हते. त्यामुळे नविन असूनही हिंमत बांधली आणि शाळेत हजर झालेल्या दोन नविन सहकार्यांच्या मदतीने पुढच्या जूनची वाट पाहु लागलो. पुढच्या जूनला सहावीचा वर्ग उघडला. त्यामुळे तीन खोल्यांच्या शाळेत मुले बसवायची अडचण होवू लागली. परत गावकर्याच्या दारात वर्ग भरवून वर्ष काढले. मुले शिकत होती. पायपीट थांबल्याने १०० % मुले शाळेत येत होते. त्यामुळे पालकही आनंदात सहकार्य करत होते.
शाळेत मुलांना शिकवण्यासोबतच त्यांना सुसंस्कारीत करून सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टिने माझे नेटाने प्रयत्न सुरू होते. यासाठी मी शाळेत मुलांच्या गरजेनुसार विविध उपक्रम राबवू लागलो. मुलांना बचतीची सवय लागावी यासाठी बालबॅंक स्थापन केली. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतीक कार्यक्रमांची सुरूवात केली. पर्यावरण जागृतीसाठी वृक्षाबंधन , वृक्षलागवडीसाठी सीडबॅंक , शालेय साहित्य शाळेतच उपलब्ध व्हावेत यासाठी स्कूल शाॅप , ज्ञानरचनावादातून शिक्षण अशा असंख्य उपक्रमांतून विद्यार्थी घडवण्याचे काम अविरत सुरू होते. मुलांच्या गरजा ओळखुन दररोज नविन प्रयोग करून बघायचा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना द्यायची माझा प्रयत्न असायचा. त्यामुळे ज्या शाळेत दुर्गम म्हणून नविन शिक्षक रूजु व्हायला घाबरायचा ती शाळा तालुक्याच्या शैक्षणिक नकाशात उपक्रमशील शाळा म्हणून अल्पावधीतच नावारूपास आली.
नवनविन प्रयोगांची मालिका सुरू असतानाच वर्ग वाढत गेले. आणि तिन वर्षातच प्राथमिक शाळा उच्च प्राथमिक शाळेत रूपांतरीत झाली. नविन वर्गांसोबत नविन शिक्षकांचीही शाळेत भर पडली. प्रशासनाने नविन वर्गखोल्या बांधुन दिल्या. गावात इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची शाळा उघडल्यामुळे कोवळ्या वयात मुलांची होणारी पायपीट थांली. त्यामुळे मुले आनंदाने शाळा शिकु लागली. आज शाळेचे विद्यार्थी जिल्ह्यातील नामांंकित महाविद्यालयांतून कष्टाने शिक्षण घेत आहेत. मागे वळुन बघताना सात आठ वर्षांपूर्वी घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळते.
- श्री. गुलाब बिसेन , कोल्हापूर
मो. नं. ९४०४२३५१९१

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा