नियम पाळायचे कुणी ?
नियम पाळायचे कुणी ?
रस्त्याने येजा करताना मध्येच अचानक कुणी आडवा आला , कुणी जागा नसताना ओव्हरटेक करू लागला , सायलेंसर काढुन गाडी पळवू लागला , जोरजोरात हाॅर्न वाजवू लागला कि , तळपायाची आग एकदम मस्तकातच जाते. बर्याचदा माणसांची आपापसात हमरीतुमरी होते. रस्त्यावर विनाकारण अडवणूक होते. त्यामुळे इतर प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागतो. असे प्रकार उद्भवू नयेत यासाठी रस्तावाहतुकिचे असंख्य कायदे आणि नियम अस्तित्वात आहेत. पण एवढे सगळे कायदे नियम असूनही प्रवासावेळी वरीलप्रकारचा त्रास काही थांबत नाही.
रस्तानियमांचे उल्लंघन करण्याची अनेक कारणे असतील त्यापैकी काही कारणे म्हणजे नियम तोडणार्याला जबर शिक्षा न होणे , यंत्रणेकडुन नियमांचे योग्य अमलबजावणी न होणे , अलिकडेच एक नविन अस्तित्वात आलेला कारण म्हणजे नियम तोडणे हे प्रतिष्ठेचे समजले जाणे.
उदा. गाडीच्या नंबर प्लेटवर फॅन्सी नंबर घालणे नियमात बसत नसतानाही अनेक दादांची ओळख हि फॅन्सी नंबरवरूनच लवकर पटते. गाड्यांच्या धुर सोडणे आणि कर्कश आवाज करणे यावर बंदि असतानाही अनेकदा गाड्यांचे सायलेंसर काढुन मोठ्या दिमाखात गाड्या फिरवल्या जातात. आणि बघणारे त्याकडे मोठ्या कुतुहलाने बघत बसतात , जणू एखादा पैलवान कुस्तीचे मैदान मारून आलाय.
वर्षभरापूर्वी ओळखीतले एक गृहस्थ अममेरीकेला मुलाकडे महिनाभर राहुन आलेत. परत आल्यावर आम्ही त्यांना तेथील अनुभव विचारले तर सर्वप्रथम त्यांनी तेथील वाहतुक नियमांचे कौतुक केले. अमेरीकेप्रमाने आपल्या देशातही वाहतुकिचे कडक नियम आहेत. परंतु आपल्या लोकांची मानसिकता घरचे नियम मोडायचे आणि बाहेरचे गप गुमान पाळायचे अशी झालेली आहे. अमेरीकेचे गोडवे गाणारे महाशय तिथे साधं रस्त्यावर थुंकायला धजावत नाहीत. पण तेच महाशय गावाकडे आल्यावर रस्त्यावर पचापचा थुंकतात. हाच फरक अमेरीकेत आणि आपल्यात आहे. घरी दादागीरी करून नियम मोडायचे आणि बाहेर गेलं कि नियम काटेकोर पाळायचे.
काही दिवसांपूर्वी मी कोल्हापूरला गेलो होतो. कोल्हापूरात गेल्यावर महाद्वार रस्त्यावर जायचे होते. मी पापाच्या तिकटिकडुन महाद्वारला जात होतो. एवढ्यात या रस्त्यावर एकेरी वाहतुक असल्याने पापाच्या तिकटिकडुन वाहने घेवून जाण्यास मनाई असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे नियम मोडायला नको म्हणून मी दुचाकि बंद करून ढकलतच रस्त्याच्या कडे कडेने महाद्वारकडे जावू लागलो.
पापाच्या तिकटिपासून मी शंभर दिडशे मीटर अतंर पार केला असेल एवढ्यात माझ्या मागून एक काॅलेजकुमार दुचाकीवर स्वार होवून आला. मी गाडी ढकलत असल्याचे बघुन तो माझ्याकडे चेष्टेने बघु लागला. जणू मीच काहितरी गुन्हा केलाय. गाडी भुर्रकन काढत म्हणाला ,
" भावा , गाडी चालवत तरी न्यायचीस , एवढा का घाबरालयस ? "
त्याच्या या बोलण्याने माझ्यावर काही परीणाम झाला नाही. मी तसाच पुढे गेलो. दुसरा नियम मोडतोय म्हणून आपणही नियम मोडायचा हे माझ्या मनाला पटत नाही. परंतु सर्वांनीच जर वाहतुक नियमांचे पालन केले तर सर्वांचा प्रवास सुखकर होईल.
© गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा