खरवीसचा डबा
बिनरक्ताची नाती ( भाग - १ )
खरवीसचा डबा
दि.१५/०९/२०१७...... मी नेहमीप्रमाणे शाळेच्या कामात व्यस्त होतो. वर्गात विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू होता. एवढ्यात शाळेपुढे गाडी थांबल्याचा आवाज आला. त्यामुळे बाहेर डोकावून मी बघु लागलो. गाडीवरून माझा बादेवाडी शाळेतील विद्यार्थी विशाल गवड (सध्या तो बारावीत आहे ) शाळेत येताना दिसला. त्याच्या हातात एक स्टिलचा डबा होता. वर्गात येताच , "नमस्कार सर " म्हणत , हातातला डबा टेबलावर ठेवत म्हणाला , " बाबांनी ( आजोबा ) तुमच्यासाठी खरवीस पाठवलाय."
विशाल हा माझा प्राथमिक शाळेतील विद्यार्थी. तो बारावीला असल्याने त्याच्या अभ्यासाबद्दल विचारपूस केली. तो काॅलेजला जायच्या गडबडीत असल्याने जास्तवेळ न थांबता लगेच निघुन गेला.
विशाल आणि त्याचा लहान भाऊ दोन्ही भावंडं माझ्याकडे शिकायला होती. तेव्हा त्यांचे आजोबा नातवांच्या अभ्यासाच्या चौकशीसाठी नेहमी शाळेत यायचे. कधी आठवड्यात , कधी पंधरा दिवसात त्यांची चक्कर शाळेकडे असायची. या आजोबांचा आपल्या नातवंडांवर अधिकच जीव ! त्यांनी शाळेत नियमीत अभ्यास करावा , यावर त्यांचा लक्ष असायचा. ते त्यांना कोणत्याही बाबतीत कमी पडु देत नसत. मुलांच्या वह्या पुस्तकांसोबतच त्यांच्या सर्व गोष्टिंकडे त्यांचे लक्ष असायचे. त्यांची ही दोन्ही नातवंड माझ्या वर्गातून पुढच्या वर्गात गेल्यावरही ते जेव्हाही भेटायचे तेव्हा मुलांच्या प्रगतीबद्दल आमची चर्चा व्हायची.
शाळेत आलेले आजोबा कधी तक्रार तर कधी नुसती भेट घ्यायला शाळेत यायचे. शाळेच्या पायर्या चढताना आधाराला काठीही सोबत असायची. त्यांना माझ्याविषयी काय वाटायचे कुणास ठावूक. पण शाळेत आल्यावर मला भेटल्याशिवाय जायचे नाहीत. माझी खुशाली विचारताना अगदी घरातील वडिलधारी व्यक्तीप्रमाणे प्रेमाने विचारपूस करायचे. मी कधी कामानिमित्त गावात त्यांना दिसलो. तर घरी येण्याचा आग्रह धरायचे. म्हैस व्ह्याली कि घरी केलेला खरवीस आमच्यासाठी शाळेत आवर्जुन पाठवायचे. जणू मी त्यांचा कुणी घरचा सदस्यच आहे. मग आम्ही सर्व सहकारी मिळुन खरवीस खायचो. असे अनेकवेळा त्यांनी दिलेला खाऊ मी खाल्लाय.
आज मी त्यांच्या गावी नसतानाही माझ्यासाठी त्यांनी पाठवून दिलेला खरवीसचा डबा बघुन मला गहिवरून आले. क्षणार्धात अनेक जुण्या आठवणी डोळ्यापुढे येवून गेल्या. या जगात रक्ताची नातीही बर्याचदा दगा देतात. तिथे हि बिनरक्ताची नाती मला अधिक मौल्यवान वाटतात.
मनाच्या एका कप्प्यात या आजोबांनी मला एवढि जागा दिली याबद्दल मी त्यांचा आजीवन रूणी राहीन. रक्ताचे नाते नसतानाही बिनरक्ताची नाती आमच्यात निर्माण झाले. अशी माणसं माझ्या आयुष्यात आलीत यासारखे दुसरे भाग्य नाही...........गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)
( फोटो - प्रातिनिधीक )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा