नंबर प्लेटचे वाचन
०० नंबर प्लेटचे वाचन ००
काल व्यवसाय भेटिसाठी गावात मुलांसोबत गेलो होतो. जाताना रस्त्याला बरीच वाहने उभी होती. यामध्ये दुचाकीपासून चारचाकी , टेम्पो या वाहनांचा समावेश होता. कामावरून घरी परतलेली मंडळी दुचाकि दारात लावतात.पण मोठी वाहने जागेअभावी मोकळी जागा बघुन रस्त्याकडेला लावतात. अशी वाहने कायमच रस्त्याकडेला वाहतुकीला अडथळा न करता लावलेली असतात. त्यामुळे वाहनधारकांना जागेअभावी होणारी गैरसोय टाळली जाते. काल मी मुलांसोबत व्यवसायभेटिला जात असल्याने मुलांनाही खुपच आनंद झाला होता. तो आनंद त्यांच्या चेहर्यावर ओसंडुन वाहताना जाणवत होता. सगळं काही नेहमीचच ! तोच रस्ता , तिच घरे , तेच दुकान परंतु शिक्षक सोबत असले कि , मुलांचा तोरा काही औरच असतो. नवनविन शिकण्यातील मुलांचा आनंद वाखानण्याजोगा होता. याचा अनुभव मला पावलापावलावर येत होता.
काही मुले माझ्यासोबत , काही उत्साहात माझ्या पुढेपुढे करत चालताचालताच गाड्यांच्या नंबर प्लेट वाचु लागले. सुरूवातीला ते फक्त शेवटचे चार अंकच वाचत असल्याचे माझ्या लक्षात आले. नंबर प्लेटवरील शेवटचे चार अंक म्हणजे पूर्ण नंबर नसून त्यापूर्वीच्या प्रत्येक अक्षर आणि अंकाला स्वत:चे वेगळे महत्व असते. त्यामुळे चालता चालताच मी मुलांना सूचना केली ,
" मुलांनो गाडीच्या नंबर प्लेटवरील संपूर्ण मजकुर वाचा."
मग मुले पूर्ण नंबर वाचू लागले. MH 09 - H - 0000 मुले नंबर वाचत वाचत चालली असताना भेटिचे ठिकाण आल्याचे बघुन आम्ही सर्व तिथे थांबलो. थोडावेळ सदर व्यवसायाची पूर्ण माहिती घेवून आम्ही माघारी फिरलो. परत येताना तोच नंबर प्लेट वाचण्याचा कार्यक्रम मुलांनी पुन्हा सुरू केला. हे सुरू असताना मुले एका वाहनाजवळ येवून थबकली.कारण आतापर्यंत त्यांच्या वाचनात फक्त MH 09 या मालिकेने सुरू झालेलेच नंबर आले होते. आता त्यांच्यापुढे MH 02 पासिंगची नंबर प्लेट वाचनात आल्याने ते काहीशे गोंधळले. mh 02 या नंबरचा अर्थ मुलांना काहीकेल्या लागेना. मुलांचा हा गोंधळ दूर करणे गरजेचे होते. त्यामुळे तशा गोंधळलेल्या अवस्थेतच मी मुलांना घेवून शाळेत आलो.
शाळेत आल्यावर माझ्या गाडीवरील नंबर प्लेट वाचायला मी सांगितले. ती नंबर प्लेट वाचुन मुले अधिकच गोंधळली. कारण त्यावर लिहिले होते MH 35. मुलांना आता त्याचाही कोणताच अर्थ लागेना. त्यांची ही अवस्था होणे साहजिकच होते. कारण गावात बहुतांश वाहने कोल्हापूर पासिंगची अाहेत आणि मुलांना गाडीच्या चारअंकी नंबरच्या आधीच्या अंकांनाही काही महत्व असतो हे माहित नव्हते. त्यांची गोंधळलेली अवस्था बघुन मी मुलांना आरटिओ पासिंग संदर्भात सविस्तर माहिती सांगितली. आपल्या वाहनांना नंबर कसे दिले जातात , वाहनांच्या नंबरमध्ये काय काय दडलेलं असते , प्रत्येक जिल्ह्याला वेगळा नंबर का दिला जातो ? , वाहनांना नंबर देणे का गरजेचे असते ? याबद्दल मुलांना सविस्तर माहीती दिली. त्यामुळे त्यांच्या मनातील गोंधळ काहीसा कमी झाला. मी सांगितलेली माहिती मुले लहान असल्याने त्यांना पूर्णपणे समजली असेलच असे नाही. परंतु त्यांच्या मनातील गोंधळ मात्र मी नक्की कमी करू शकलो.
© गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा