पोस्ट्स

प्रामाणिकपणाचं बक्षिस

प्रामाणिकपणाचं बक्षिस सिहोरा हे तुमसर तालुक्यातील बाजारपेठेचे गाव.  मुख्यरस्त्यावर गाव असल्याने तिथे बर्‍याचदा माझे येणे जाणे होते. या गावात दिवाळीनंतर दहा बारा दिवसाने  "जलसा" भरतो. हा जलसा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कलारसिक हा जलसा बघायला प्रचंड गर्दि करतात. पाच ते दहा दंडार मंडळांचा सहभाग यात दरवर्षी असतो. काही वर्षांपूर्वी मी हा जलसा बघायला गेलो होतो. जलशात पाय ठेवायला जागा शिल्लक नव्हती. अवती भवतीच्या मंडळींना धक्का न लागता पुढे - मागे जाणे केवळ अशक्य होतं. अशा तोबा गर्दित मी दंडार बघायला शिरलो. दंडार मंडळे आपली कला सादर करत होते. कलारसिक कलेला दाद देत होते. कलेचा हा मेळा डोळ्याचे पारणे फेडणारा असाच होता. एकिकडे दंडार कलावंतांचा कलाविष्कार सुरू असताना दुसरीकडे छोटे व्यावसायिक मंडळी जिलेबी , शिंगाडे , फुगे , भजी , खेळणी इ. ची दुकाने लावून आपल्या प्रपंचाची तजविज करण्यात व्यस्त होते. जलसा बघणारी मंडळी दंडार बघुन झाल्यावर या छोट्या छोट्या दुकानांमध्ये वस्तूंची खरेदि करत होते. कुणी खाद्य पदार्थांवर ताव मारत होते. तर कुणी लहान मुलांसाठी फुगे , खेळणी घेत होते. दंडारीचा आस्वा...

माणसांपेक्षा मांजरं बरी

माणसांपेक्षा मांजरं बरी  शुभकार्य करत असताना मुहुर्त बघनं हे आपल्या समाजात सर्वमान्य आहे. मुहुर्तावर केलेले काम निर्विघ्न पार पडुन ते तडिस जाते असा जनमानसात समज आहे. यासाठी जानकारांची मदत घेवून शुभकार्याची वेळ बघितली जाते. त्याचसोबत येणारी प्रत्येक वेळ शुभ मानुन कार्य करणारी मंडळीही आपल्या समाजात आहेत. ते मुहुर्त बघण्याच्या नादाला लागत नाहीत. परंतु एकंदरीत प्रमाण बघितल्यास मुहुर्त बघण्याकडे समाजाचा कल अधिक आहे. काहीवेळा याचा अतिरेक होतानाही आपल्याला दिसतो. त्याचाच एक भाग म्हणजे कुठलेही काम करताना ( उदा. लग्न , बारसं , मुंज , वास्तुशांती , गृहप्रवेश , वाहनखरेदि  इ. ) मुहुर्त बघितल्याशिवाय न करनं. बर्‍याचदा मुहुर्त बघुनही शुभकार्यात मांजर आडवी जाते. ( शुभकार्यात मांजर आडवी जाणं आपण अशुभ मानतो.) मांजर आडवी जाणं हे अशुभ असनं यात कितपत सत्यता आहे , हे संशोधकच जाणोत. कारण आपल्याकडे मांजर हा पाळिव प्राणी असुन तो घराघरात पाळला जातो. काही ठिकाणी न पाळताही त्याचा मुक्त वावर घरात असलेला दिसून येतो. त्यामुळे मांजर रस्त्यावरून येजा करणार हे नक्की. मग कुठे शुभकार्य सुरू आहे हे तिला कळ...

भाषेची शेती करणारं गाव

भाषेची शेती करणारं गाव माणवी उत्क्रांतीच्या काळात आपापसात संवाद साधण्यासाठी माणवाने भाषेची निर्मिती केली. पुढे भाषांचा विकास होवून यातून लोकांचा दैनंदिन व्यवहार चालु लागला. आपल्या देशात अस्तित्वात असलेल्या असंख्य भाषांतून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बोलल्या जाणार्‍या भाषांवरून प्रांतरचना झाली. त्यातून आपला मराठी भाषिकांचा महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आला. महाराष्ट्रात मुख्यत: मराठी हि मुख्य भाषा बोलली जात असली तरी चांदा ते बांदा पसरलेल्या महाराष्ट्रात मराठीचे रूप दर कोसावर बदलत जाते. त्यांनाच आपण बोली भाषा म्हणतो. याच बोलीला काही तथाकथीत सुशिक्षित मंडळी "गांवढळ / गावठी" असा शिक्का मारत ती बोलणार्‍या बहुसंख्य सर्वसामान्यांना हिनवण्यात धन्यता मानतात. अशा ग्रामिण भाषेत संवाद साधणार्‍याला  "गावठी" संबोधले जाते. मात्र ग्रामिण बोली बोलणार्‍यांना गावंढळ किंवा गावठी संबोधने हे तथाकथित सुशिक्षितांचे केवळ आणि केवळ अज्ञान आहे. बर्‍याचदा सुशिक्षित मंडळी खोट्या प्रतिष्ठेपोटि बोली बोलायचे टाळतो. आपला देश हा खेड्यांचा देश आहे. शहरीकरणाच्या वादळात अनेक गावं ओस पडली. अनेक गाव निर्म...

कंजुषी कराच

कंजुषी कराच वाहनांची वाढती संख्या आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यांच्या व्यस्त समिकरणामुळे सर्वसामान्य जनतेला इंधनदरवाढिला सामोरे जावे लागत आहे. पेट्रोल , डिझेल , वीज पासून घरगुती वापराच्या गॅसपर्यंत सर्वत्र सारखी दरवाढ होत आहे. पेट्रोल , डिझेलचे दर गगनाला भिडले असून त्यात दररोज वृद्धिच होत चालली आहे. यात सर्वसामान्य जनता पुरती भरडली जात आहे. हे आज न उद्या घडणारच होते. नैसर्गिक साधन संपत्तीचे मर्यादित साठे कधिना कधी संपणारच. त्यामुळे अशा दरवाढिचा सामना कायमच करावा लागणार हे नक्की.  नैसर्गिक इंधनाचा (उदा. पेट्रोल , डिझेल , एलपीजी गॅस) काळजीपूर्वक वापर करण्यासंदर्भात विविध कंपन्या ( उदा. हिंदुस्थान पेट्रोलियम , भारत पेट्रोलियम इ.) तसेच भारत सरकारच्या संबंधित मंत्रालयामार्फत विविध प्रसारमाध्यमांतून (उदा. वर्तमानपत्र , टि.व्ही. , रेडिओ इ. ) जनजागृती केली जातेय. अशाच जाहिराती टिव्हीवर कायम दिसत असतात. त्या म्हणजे वाहन पंचेचाळिसच्या वेग मर्यादेत चालवल्यास वीस टक्के इंधनाची बचत होवून परिणामी त्यावर होणारा इंधनखर्च वाचेल आणि तेवढि बचत होईल. याचसोबत सिग्नलवर उभे असताना गाडी बं...

राजा भोज अना महाकवी कालिदास

##  राजा भोज अना महाकवी कालिदास  ## ((  मूळ मराठी कथा -  " महाकवी कालिदास " लेखिका - उषा टिळक पोवारी अनुवाद - गुलाब रमेश बिसेन  )) इ. स. अकराव् सतकक् सुरूवातमा धारानगरीमा भोजराजा राज्य करत होतो. वाक्पनिराज मुंजराजाको यव नाती. दुर्भाग्यलक टुरा अकाली मरेलक राजा मुंजराजान् वयक् सोळा - सतरा सालक् उमरमा भोजराजाला गादिपर बसायस्यान वोक्ंपर राज्य सोपायस्यान बचेव आयुष्य ईश्वरचिंतनमा व्यतित  करणसाठी मनुन जंगलमा निकल गयव. कम उमरमा राजा भोजन् राज्यको कारोबार चांगलो तरीकालक चलायीस. एवळोच नयीत् दक्षिणमा नर्मदा नदि पार करस्यान तापी नदिवरी वोन् आपलो साम्राज्य बढायीस. जागोजाग नदिपर घाट अना आवनेजानेवाल्ंयीनसाठी धर्मस्याळा बांधिस. भोपालको भलो मोठो तलाव वोनच बांधिस. देऊळयीनला वर्षासन देयीस. राजा भोज जेवळो पराक्रमी होतो वोकंधून जास्त विद्वान अना रसिक होतो. बहुत गुणीजनयीनला , विद्वानयीनला वोन् आपल् छत्रछायामा ठेयी होतीस. राजा भोजक् औदार्यकी , रसिकताकी ख्याती दूर दूरवरी पोहची होती. बहुतसारा गायक , नर्तक , विद्वान , कलाकार दूर देसलक प्रवास करस्यान भोजराजाकन आवत अना आपल्...

नातो - सारी भाटवाको

नातो...... सारी भाटवाको :::::::::::::::::::::::::::::::::::: " सारी अर्धी घरवाली " असो कयी जमानोपासून कयेजासे. पर सारीला घरवाली करनेवाला हिम्मतबहाद्दर तसा कमच ! सारी भाटवाको नातो एवळोच मर्यादित से असो नयी. यकंपेक्षा अलग नातो से सारी - भाटवाको. यन् नातोकी सुरूवात भाटवा जबं टुरी देखन आपलं सुसरो घरं जासे तबं खिळकिमालक लुकाय लुकाय देख टुरा कसोक से एकि खबर लायनांगं पोहचावनको कामलका होसे. मंग बियामा भाटवाका जुत्ता लुकायशान भाटवाला सारीच लुटसे. पर यव लुटनो आपलं परंपराको एक हिस्सा समजशान सारीकनलक जुत्ता लुकाये जासेत. सारी भाटवाको यव रिस्ता होरिमा चांगलोच बहरसे. जिजाजीला रंगलका रंगावनको काम सारी बखुबी निभावसे. यन् रिस्ताला बाहेरकं दुनियामा बढाय चढायकर , चटणी मीठ लगायशान रंगायव जासे. पर यव रिस्ता जेतरो हासी मज्याकलक भरेव से वोतरोच जवाबदारीकोबी से.. सारीक् बियामा मांडोला तोरण बांधनो , सुसरंक् गावक् देवयीनला हरदि चढावनोपासून त् नवदेवपर रंग झोकनोवरिको काम यव भाटवाच जबाबदारीलक करसे. सारीको बिया भाटवा बिगर होय नयी सक् येव वोतरोच खरो से. बाहेरकं दुनियामा सारी भाटवाको नातो जेतरो रंगाय...

जाहिरातींची अजब दुनिया

##  जाहिरातींची अजब दुनिया  ## ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: ग्राहकांना आपल्या उत्पादनांकडे आकर्षित करण्यासाठी उत्पादक कायमच नवनविन शक्कल लढवत असतात. कधी छापिल किमतीवर भरघोष सुट तर कधी एकावर दुसरी वस्तु फुकट. कधी कल्पक जाहिराती तर कधी घरपोच सेवा. अशा नानाविध मार्गाने प्रत्येक उत्पादक आपला ग्राहक पक्का करण्याचा प्रयत्न करत असतो. याचाच प्रत्यय आपल्याला दूरदर्शन , आकाशवाणी , वर्तमानपत्र यांतील जाहिराती बघताना येतो. बरेच उत्पादक आपल्या उत्पादनाच्या जाहिराती महामार्गावर मोठमोठे होर्डिंग लावून करत असतात. ग्रामिण भागात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आरोळी ठोकणे , नमुना दाखवणे , प्रात्यक्षिक करून दाखवणे इत्यादि मार्गांचा वापर करतात. यामागे प्रत्येकाचा हेतु हा आपले उत्पादन विकणे हाच असतो. मग तो ग्राहकाला गरजेचा , परवडणारा असो वा नसो. मेरा काम बनता तो भाळमे जाए जनता असाच एकंदरित हेतु असतो. माल खपण्याशी मतलब. वर्तमानात प्रसारमाध्यमांतून जाहिरातींचा होणारा भडिमारामुळे ग्राहक अक्षरश: गांगरून जातो. जाहिरातीत दाखवली जाणारी गोष्टच सत्य मानुन वस्तुची खरेदि करतो. या...