जाहिरातींची अजब दुनिया

##  जाहिरातींची अजब दुनिया  ##
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्राहकांना आपल्या उत्पादनांकडे आकर्षित करण्यासाठी उत्पादक कायमच नवनविन शक्कल लढवत असतात. कधी छापिल किमतीवर भरघोष सुट तर कधी एकावर दुसरी वस्तु फुकट. कधी कल्पक जाहिराती तर कधी घरपोच सेवा. अशा नानाविध मार्गाने प्रत्येक उत्पादक आपला ग्राहक पक्का करण्याचा प्रयत्न करत असतो. याचाच प्रत्यय आपल्याला दूरदर्शन , आकाशवाणी , वर्तमानपत्र यांतील जाहिराती बघताना येतो.

बरेच उत्पादक आपल्या उत्पादनाच्या जाहिराती महामार्गावर मोठमोठे होर्डिंग लावून करत असतात. ग्रामिण भागात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आरोळी ठोकणे , नमुना दाखवणे , प्रात्यक्षिक करून दाखवणे इत्यादि मार्गांचा वापर करतात. यामागे प्रत्येकाचा हेतु हा आपले उत्पादन विकणे हाच असतो. मग तो ग्राहकाला गरजेचा , परवडणारा असो वा नसो. मेरा काम बनता तो भाळमे जाए जनता असाच एकंदरित हेतु असतो. माल खपण्याशी मतलब.

वर्तमानात प्रसारमाध्यमांतून जाहिरातींचा होणारा भडिमारामुळे ग्राहक अक्षरश: गांगरून जातो. जाहिरातीत दाखवली जाणारी गोष्टच सत्य मानुन वस्तुची खरेदि करतो. यामुळे बर्‍याचदा ग्राहक लुबाडलाही जातो. सध्यातर बरेच उत्पादने केवळ जाहिरातींमुळेच जनतेला कळतात. त्यामुळे प्रसारमाध्यमातून जाहिरात झळकणारे उत्पादनच दर्जेदार असा गोड गैरसमज सर्वसामान्य जनतेचा होताना दिसतोय. असो सुज्ञ ग्राहक योग्य काय ते ठरवेलच.

 आज वर्तमानपत्र उघडताच मला एक जाहिरात दिसली. तशा दररोजच वर्तमानात जाहिराती असतात. नव्हे जाहिरात हा वर्तमानपत्राचा अविभाज्य अंगच बनुन गेलाय. आजच्या या जाहिरातीचे विशेष म्हणजे या जाहिरातीला त्या उत्पादनाचे चक्क सॅम्पल चिकटवलेले होते. हे पाहुन मला थोडा धक्काच बसला. आजपर्यंत एखाद्या उत्पादनाला सॅम्पल चिकटलेले मी बर्‍याचदा बघितले. पण चक्क वर्तमानपत्रालाच उत्पादनाचे सॅम्पल चिकटवून जाहिरात मी पहिल्यांदाच बघत होतो. असो हे जाहिरातीचे युग आहे. त्यामुळे अशा कल्पक जाहिराती पाहायला मिळतच राहतील........... गुलाब बिसेन (9404235191)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा