प्रामाणिकपणाचं बक्षिस
प्रामाणिकपणाचं बक्षिस
सिहोरा हे तुमसर तालुक्यातील बाजारपेठेचे गाव. मुख्यरस्त्यावर गाव असल्याने तिथे बर्याचदा माझे येणे जाणे होते. या गावात दिवाळीनंतर दहा बारा दिवसाने "जलसा" भरतो. हा जलसा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कलारसिक हा जलसा बघायला प्रचंड गर्दि करतात. पाच ते दहा दंडार मंडळांचा सहभाग यात दरवर्षी असतो. काही वर्षांपूर्वी मी हा जलसा बघायला गेलो होतो. जलशात पाय ठेवायला जागा शिल्लक नव्हती. अवती भवतीच्या मंडळींना धक्का न लागता पुढे - मागे जाणे केवळ अशक्य होतं. अशा तोबा गर्दित मी दंडार बघायला शिरलो. दंडार मंडळे आपली कला सादर करत होते. कलारसिक कलेला दाद देत होते. कलेचा हा मेळा डोळ्याचे पारणे फेडणारा असाच होता.
एकिकडे दंडार कलावंतांचा कलाविष्कार सुरू असताना दुसरीकडे छोटे व्यावसायिक मंडळी जिलेबी , शिंगाडे , फुगे , भजी , खेळणी इ. ची दुकाने लावून आपल्या प्रपंचाची तजविज करण्यात व्यस्त होते. जलसा बघणारी मंडळी दंडार बघुन झाल्यावर या छोट्या छोट्या दुकानांमध्ये वस्तूंची खरेदि करत होते. कुणी खाद्य पदार्थांवर ताव मारत होते. तर कुणी लहान मुलांसाठी फुगे , खेळणी घेत होते. दंडारीचा आस्वाद घेतल्यावर मीही जलशातून काढता पाय घेवून मुलासाठी फुगा घ्यायच्या इराद्याने फुग्याच्या दुकानांकडे वळलो. जलशात चार पाच फुग्याची दुकाने दृष्टिस पडत होती. हि सर्व दुकाने सायकलरच ऊभी काठी बांधुन त्याला फुगवलेले रंगीबेरंगी फुगे बांधुन थाटली होती.
फुग्यांच्या दुकानांकडे एक नजर फिरवत मी फुगा घ्यायला कुणाकडे जायचे हे बघु लागलो. एवढ्यात मला एक बारा तेरा वर्षांचा शाळकरी मुलगा रस्त्याकडेला सायकल उभी करून फुग्यांचा आवाज करत " फुगे , फुगे " असा आरोळी देताना दिसला. त्याच्या फुग्यांचा आवाज तेवढ्या गोंगाटातही माझ्या कानांपर्यंत पोहचत होता. क्षणार्धात मी त्याच्याकडुन फुगा विकत घेण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यापूर्वी फुग्यांचा दर काय आहे याची चौकशी करावी म्हणून मी इतर विक्रेत्यांकडे चौकशी करायला लागलो. सगळ्यांनी मला एका फुग्याची किंमत दहा रूपये सांगितली.
दराची चौकशी झाल्यावर मी पूर्वी ठरवल्याप्रमाणे त्या बारा तेरा वर्षांच्या शाळकरी मुलाकडुन फुगा घ्यायला गेलो. दर माहित असल्याने परत दर विचारायचा प्रश्नच नव्हता. मी एक फुगा घेवून त्याला दहा रूपयांची नोट दिली. पैसे देवून मी निघणार एवढ्यात त्या मुलाने पाचचा शिक्का माझ्या हातात टेकवला. हे बघुन मला थोडं आश्चर्यच वाटलं. दहाला एक फुगा असताना हा मुलगा पाच रूपये परत का देतोय ? असा प्रश्न मला पडला. मी त्याला पैसे तुझ्याकडेच ठेव म्हटल्यावर त्याने मला त्याच्याकडील फुग्याचा दर पाच रूपये असल्याचा खुलासा केला. हे बघुन मला माझ्या कानावर काहीक्षण विश्वास बसला नाही. इतर विक्रेते दहा रूपयाला एक फुगा विकत असताना हा मुलगा त्यांच्या निम्म्या किमतीत फुगे विकत बसला होता. मुळात फुग्याचा मुलाने केलेला पाच रूपये दरच योग्य होता. परंतु काही विक्रेते फुग्यांची चढ्या भावात विक्री करून ग्राहकांना लुबाडत होते.
एकिकडे जादा दराने फुगे विकणारे विक्रेते आणि दुसरीकडे त्यांच्या निम्म्या दरात फुगे विकणारा शाळकरी मुलगा. जादा पैशांचा मोह त्याला कसाकाय झाला नाही याचेच मला आश्चर्य वाटत होते. जगात एकिकडे टाळुवरचे लोणी खाणारी मंडळी तर दुसरीकडे या फुगे विकणार्या गरीब घरातील मुलाप्रमाणे प्रामाणिकपणा असणारी मंडळी आहे. प्रामाणिकपणा दिवसेंदिवस कमी होताना दिसत असला तरी तो अशा मुलाच्या रूपाने कधीकधी आपलं अस्तित्व दाखवत असतो. हाच प्रामाणिकपणा या जगाचं संतुलन राखण्यात महत्वाची भूमिका पार पाडत असेल कदाचित.
मी त्याच्या हातातले पैसे माझ्या हातात घेवून त्याच्याजवळ उभा राहुन त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न करू लागलो. त्याला नाव विचारताच त्याने मला त्याच्या नावासकट गावाचे नाव सांगितले. मी पुढे त्याच्या शाळेची चौकशी केल्यावर तो त्याच्या गावातल्या शाळेतच इयत्ता सहावीत शिकत असल्याचे सांगु लागला. फुगे विक्रि करण्याचे काम किती दिवस करतोस ? या माझ्या प्रश्नावर तो म्हणाला ,
" आता आमच्या शाळेलं दिवारीच्या सुट्ट्या आयेत. दिवारीच्या सुट्टित मंडई , जलस्यायीत मी फुगे इकतो. "
त्याच्या या खुलाशावर मी त्याला शाळा न बुडवण्याचा सल्ला दिला.
" रात्री तु कोठी थांबतेस ? "
या माझ्या प्रश्नावर तो म्हणाला ,
" आमचा गाव सिवर्याहुन नव दाहा किमी आये. माह्या संगवाल्यायसंगा मी रातीच वापस जातो."
घरच्या परिस्थितीमुळे फुगे विकणारा हा मुलगा दिवाळीच्या सुट्टित गावापासून दहा बारा किमीच्या परिघातील गावांमध्ये फुगे विकायचा. जलसा , मंडयी संपल्यावर रात्रीच आपल्या सोबतच्या मंडळींसोबत सायकलने गावी परत जायचा. सुट्टित फुगे विकुन तो घरच्यांना अार्थिक आधार देण्यात आपला खारीचा वाटा उचलत होता. मुलाशी सुरू असलेला हा संवाद संपूच नये , असे मला वाटत होते. परंतु मागुन पुढुन येणारी गर्दि मात्र आमचा संवाद तोडण्यात कुठलीच कसर सोडत नव्हती. शेवटि मुलाच्या धंद्यात व्यत्यय नको म्हणून मीच तिथुन काढता पाय घेतला. जाताना माझ्या हातातला पाच रूपयांचा शिक्का मी परत त्याच्या हातात ठेवला. त्याला वाटले मला अजुन एक फुगा पाहिजे असेल. म्हणून त्याने एक फुगा काढुन मला देण्याचा प्रयत्न केला. मी त्याचा फुगा परत केला. त्यावर तो म्हणाला ,
" तुमचे पाच रूपये ?"
मी म्हणालो ,
" ते तु तुयाजवरच ठेव , तुया इमानदारीसाटि. "
श्री. गुलाब बिसेन , मु. सितेपार , ता. तिरोडा , जि. गोंदिया (९४०४२३५१९१)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा