पोस्ट्स

नातो - सारी भाटवाको

नातो...... सारी भाटवाको :::::::::::::::::::::::::::::::::::: " सारी अर्धी घरवाली " असो कयी जमानोपासून कयेजासे. पर सारीला घरवाली करनेवाला हिम्मतबहाद्दर तसा कमच ! सारी भाटवाको नातो एवळोच मर्यादित से असो नयी. यकंपेक्षा अलग नातो से सारी - भाटवाको. यन् नातोकी सुरूवात भाटवा जबं टुरी देखन आपलं सुसरो घरं जासे तबं खिळकिमालक लुकाय लुकाय देख टुरा कसोक से एकि खबर लायनांगं पोहचावनको कामलका होसे. मंग बियामा भाटवाका जुत्ता लुकायशान भाटवाला सारीच लुटसे. पर यव लुटनो आपलं परंपराको एक हिस्सा समजशान सारीकनलक जुत्ता लुकाये जासेत. सारी भाटवाको यव रिस्ता होरिमा चांगलोच बहरसे. जिजाजीला रंगलका रंगावनको काम सारी बखुबी निभावसे. यन् रिस्ताला बाहेरकं दुनियामा बढाय चढायकर , चटणी मीठ लगायशान रंगायव जासे. पर यव रिस्ता जेतरो हासी मज्याकलक भरेव से वोतरोच जवाबदारीकोबी से.. सारीक् बियामा मांडोला तोरण बांधनो , सुसरंक् गावक् देवयीनला हरदि चढावनोपासून त् नवदेवपर रंग झोकनोवरिको काम यव भाटवाच जबाबदारीलक करसे. सारीको बिया भाटवा बिगर होय नयी सक् येव वोतरोच खरो से. बाहेरकं दुनियामा सारी भाटवाको नातो जेतरो रंगाय...

जाहिरातींची अजब दुनिया

##  जाहिरातींची अजब दुनिया  ## ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: ग्राहकांना आपल्या उत्पादनांकडे आकर्षित करण्यासाठी उत्पादक कायमच नवनविन शक्कल लढवत असतात. कधी छापिल किमतीवर भरघोष सुट तर कधी एकावर दुसरी वस्तु फुकट. कधी कल्पक जाहिराती तर कधी घरपोच सेवा. अशा नानाविध मार्गाने प्रत्येक उत्पादक आपला ग्राहक पक्का करण्याचा प्रयत्न करत असतो. याचाच प्रत्यय आपल्याला दूरदर्शन , आकाशवाणी , वर्तमानपत्र यांतील जाहिराती बघताना येतो. बरेच उत्पादक आपल्या उत्पादनाच्या जाहिराती महामार्गावर मोठमोठे होर्डिंग लावून करत असतात. ग्रामिण भागात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आरोळी ठोकणे , नमुना दाखवणे , प्रात्यक्षिक करून दाखवणे इत्यादि मार्गांचा वापर करतात. यामागे प्रत्येकाचा हेतु हा आपले उत्पादन विकणे हाच असतो. मग तो ग्राहकाला गरजेचा , परवडणारा असो वा नसो. मेरा काम बनता तो भाळमे जाए जनता असाच एकंदरित हेतु असतो. माल खपण्याशी मतलब. वर्तमानात प्रसारमाध्यमांतून जाहिरातींचा होणारा भडिमारामुळे ग्राहक अक्षरश: गांगरून जातो. जाहिरातीत दाखवली जाणारी गोष्टच सत्य मानुन वस्तुची खरेदि करतो. या...

घुगरी

##  घुगरी  ## घुगरी...... यव तिन अक्षरको शब्द तोंडमालक लेनकंघनी शब्द जसो बायेर पळंसे तसो ओकंसंगच तोंडला पाणी सुटनो चालु होसे. कायेका येनं घुगरीकी चवच मोटि न्यारी से. पोपटकि घुगरी असी तोंडमा धरिसका वोकी चव तोंडमा घुमतच रवसे. आपलं पोवार समाजमा घुगरीकि परंपरा मोळि पुरानी से. यनं घुगरीको संबंध आपलं पुरवजयीननं आपलं रोजमर्राकं जिनगी संग अना आपलं धार्मिक विधिसंग जोळनको कारण मला घुगरीनकी जिभलाबी नाचावनेवाली चवच रये असो मोला लगंसे. पराकं घातं रोवणा सरणकं दिवस बांधिपर परा बळावनकी घाई चली रवसे से. पेंडकर , खारखोद्या , चिखल करनेवालो नांगर्‍या अना रोवना लगावनेवाली रोजदारं परा सरनकं खुसिलका पटपट रोवणा लगावसेत त् उत् घरमा पटलिन घुगरी रांधनकी तयारी एक दिवस पयलेपासूनच करस्यान ठेवसे. पटलिनकं हातकी गहु अना चनाकी घुगरी बांधिपरकं सपा मजुर अना रोजदारयीनसंगं रातवा सहभोजन करशान आनंदलक खाये जासे. गहुकि घुगरी परामा सोळिसतं बाकिघन् कोनी खाता नयी दिसं. ओकलकच गहुकं घुगरीकि याद आवत रवसे. घुगरी खानकोच भयवतं चनाकी घुगरी घरगर खाये जासे पर पोपटकं घुगरीनं आपलं समाजमनपर असो कायी मोहनी डाकिसेस का यकं बिगर ...

सावधान - वाहने सावकास हाका

सावधान.....वाहने सावकास हाका साखर कारखाने सुरू झाल्यापासून शेतातील हालचाली वाढल्या तशाच रस्त्यावरिलही हालचाली वाढल्या आहेत. शेतकरी आपला ऊस लवकरात लवकर कारखान्यापर्यंत कसा पोचेल या तयारीत जोडणीला लागलाय. ऊस जेवढा लवकर कारखान्यात पोहचेल तेवढ्या लवकर शेत मोकळं होवून पुढच्या ऊसाची लावण करायला शेतकर्‍यांना बरं पडतं. शिवाय ऊसाला पाणी कमी काळ पाजावा लागतो. ऊसतोड लवकर नाही झाली तर नविन ऊस लावायचा कालावधी वाढतो शिवाय ऊसाला पाणी पाजत पोसावं लागतं.या सर्व विवंचणेत शेतकरी सध्या आपल्याच धुंदित आहे. शेतात भर पहाटे गोठवणार्‍या थंडीत ऊस तोड कामगार ऊस तोडताहेत. तर ऊस वाहतुक करणारी मंडळी आपले ट्रॅक्टर , बैलगाड्या भरून कारखान्याकडे धाव घेताहेत. या सर्व घडामोडीमुळे सहसा निर्जन असणार्‍या रस्त्यांनाही जिवंतपणा आलाय. रस्त्यांची वर्दळ अधिकच वाढलिय. बरेच रस्ते खड्डेयुक्त असल्याने अशा रस्त्यांवरून ऊस वाहतुक करताना गाडीवान आणि ड्रायव्हर यांना तारेवरची कसरतच करावी लागते. त्यात जादा ऊस भरल्याने , चढाला ट्रॅक्टरचे इंजिन वरती उचलुन, टायर फुटुन , बैलांचे पाय घसरून , ओव्हरटेक करताना अनेक अपघात होतात. या काळात र...

गावची दंडार , गावची शान

##  " गावची दंडार , गावची शान "  ## ०००००००००००००००००००००००००  गोंदिया जिल्ह्याच्या पश्चिम टोकावर वसलेला सितेपार गाव म्हणजे जिल्ह्याचा पश्चिम प्रवेशद्वार. निसर्ग सौंदर्याने नटलेला आमचा गाव. गावापासून हाकेच्या अंतरावर असलेला नागझिरा अभयारण्यामुळे हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टिने समृद्ध आहे . गावाला लोककलेचा समद्ध वारसा लाभला आहे. गावात नौटंकि ड्रामा , संगीत नाटक , तमाशा , भजन , किर्तन तसेच दंडार या लोककलांचा समृद्ध वारसा लाभला आहे. गावातील  " होली " समाज डफरी वादन कलेला जगवत स्वत:ही जगत आहे. गावाची ओळख या लोककलांपेक्षा वीट भट्टि ठेकेदारीसाठी अधिक असली तरी अलिकडे गावातील कलाकार कलाक्षेत्रात गावाची ख्याती वाढवत आहेत. लोककलेचा समृद्ध वारसा लाभलेल्या झाडीपट्टितील सितेपार गावात लोककलावंत घराघरात आहेत. ढोलक , तबला , सुरपेटि या वाद्यांपासून ते भजन , दंडार , नाटक या लोककलांचे कलाकार आजही पदरमोड करून कलेची जोपासना करत आहेत. नांगोजी रहांगडाले (नांगो महाजन) यांनी त्यांच्या काळात सितेपारच्या दंडारीची बांधनी करून पंचक्रोशीत वेगळी ओळख निर्माण करून दिली. प्रसंगी पदरमोड करून न...

शाळेचं बदललेलं रूप

##  शिक्षकांच्या सहा महिन्यांच्या अथक परिश्रमाने आमच्या शाळेचं ( विद्यामंदिर उंड्री ता. पन्हाळा जि. कोल्हापूर ) बदललेलं रूप  ## जून महिन्यात सन २०१८ : १९ या शैक्षणिक सत्राची सुरूवात झाली. नविन शाळा , नविन वातावरण , नविन विद्यार्थी , नविन पालक आणि नविन सहकारी ! आमची इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची शाळा दोन ठिकाणी भरायची. शाळेत मुख्याध्यापकांसह एकुण सात शिक्षक कार्यरत होते. यापैकी इयत्ता १ ली ते ४ थी चे काही वर्ग गावातील जुन्या इमारतीत तर ५ वी ते ७ वीचे वर्ग माळावरच्या नविन इमारतीत भरायचे. त्यामुळे शालेय कामकाजात अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागायचे. कुठलाही कार्यक्रम घ्यायचा झाल्यास त्यात विस्कळितपणा यायचा. . त्यामुळे मुख्याध्यापकांसह आम्ही सर्व शिक्षकांनी मिळुन शाळेत एकसंधपणा येण्यासाठी सर्व वर्ग माळावरच्या इमारतीत एका छताखाली भरवायचा निर्णय घेतला. याठिकाणी प्रशस्त मैदान आणि पुरेशा वर्गखोल्या आहेत. शाळेचा व्हरांडा उघडा असल्याने पावसात परिपाठ किंवा एखादा कार्यक्रम घेताना अडचण व्हायला लागली. एखाद्या वर्गात कार्यक्रम घ्यायचा असल्यास मुले कोंडल्यासारखे बसवावी लागायची. त्यामुळे ...

सर , आमचा सेलफी काढा की !

##   सर , आमचा सेल्फि काढाकी !  ## ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ दुपारचे जेवन करून मुलांनी झाडाच्या सावलीखाली खेळ मांडला होता. प्रत्येक मुलगा कुठल्यानं कुठल्या खेळात व्यस्त होता. मुलांचं विश्वच वेगळं असतं. जराजरी वेळ मिळाली कि खेळ सुरूच. त्यात दुपारची सुट्टितर निवांपणाची ! कडक उन्हामुळे पहिलीच्या मुलींनी झाडाखाली आपला खेळ मांडला होता. मी त्यांच्याजवळुन जात असल्याचे लक्षात येताच पहिलीच्या मुलींनी माझ्याभोवती घोळका केला. त्यामुळे मला पुढे जाता येईना. यावेळी माझ्या हातातला मोबाईल बघुन पहिलीची वेदिका पुढे होवून मला म्हणाली ,   " सर , आमचा सेल्फि काढाकि. " तिच्या सोबत तिच्या सर्व मैत्रिनींनी मला फोटो काढण्याचा हट्ट धरला. त्यांच्या निरागस चेहर्‍यावरचा भाव बघुन मला त्यांचा हट्ट टाळता आला नाही. नव्हे ते शक्यच नव्हते. त्यामुळे लगेच मोबाईलचा कॅमेरा सुरू करून त्यांचा फोटो काढायला फोटोग्राफर म्हणून मी सज्ज झालो. क्षणार्धात मुलींनी वेगवेगळ्या पोज देत माझ्याकडुन फोटो काढुन घेतल्या. तोपर्यंत मुलेपण तिथे येवून पोहचले. फोटो काढुन झाल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद बघण्यासारखा ...