सावधान - वाहने सावकास हाका
सावधान.....वाहने सावकास हाका
साखर कारखाने सुरू झाल्यापासून शेतातील हालचाली वाढल्या तशाच रस्त्यावरिलही हालचाली वाढल्या आहेत. शेतकरी आपला ऊस लवकरात लवकर कारखान्यापर्यंत कसा पोचेल या तयारीत जोडणीला लागलाय. ऊस जेवढा लवकर कारखान्यात पोहचेल तेवढ्या लवकर शेत मोकळं होवून पुढच्या ऊसाची लावण करायला शेतकर्यांना बरं पडतं. शिवाय ऊसाला पाणी कमी काळ पाजावा लागतो. ऊसतोड लवकर नाही झाली तर नविन ऊस लावायचा कालावधी वाढतो शिवाय ऊसाला पाणी पाजत पोसावं लागतं.या सर्व विवंचणेत शेतकरी सध्या आपल्याच धुंदित आहे.
शेतात भर पहाटे गोठवणार्या थंडीत ऊस तोड कामगार ऊस तोडताहेत. तर ऊस वाहतुक करणारी मंडळी आपले ट्रॅक्टर , बैलगाड्या भरून कारखान्याकडे धाव घेताहेत. या सर्व घडामोडीमुळे सहसा निर्जन असणार्या रस्त्यांनाही जिवंतपणा आलाय. रस्त्यांची वर्दळ अधिकच वाढलिय. बरेच रस्ते खड्डेयुक्त असल्याने अशा रस्त्यांवरून ऊस वाहतुक करताना गाडीवान आणि ड्रायव्हर यांना तारेवरची कसरतच करावी लागते. त्यात जादा ऊस भरल्याने , चढाला ट्रॅक्टरचे इंजिन वरती उचलुन, टायर फुटुन , बैलांचे पाय घसरून , ओव्हरटेक करताना अनेक अपघात होतात.
या काळात रस्ते अपघात टाळणे हि प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारखाना परिसरात ऊसाने भरलेल्या वाहणांची मोठी गर्दि असते. काही चालक रिकामे ट्रॅक्टर भरधाव वेगाने नेतात. अशा परिसरात वाहन चालवताना चालकांनी गतीवर संयम ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाने वाहतुकिचे नियम पाळुन एकमेकांना सहकार्य केल्यास अपघातापासून रस्त्यांना नक्किच दुर ठेवता येईल........... गुलाब बिसेन (9404235191)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा