शाळेचं बदललेलं रूप

##  शिक्षकांच्या सहा महिन्यांच्या अथक परिश्रमाने आमच्या शाळेचं ( विद्यामंदिर उंड्री ता. पन्हाळा जि. कोल्हापूर ) बदललेलं रूप  ##

जून महिन्यात सन २०१८ : १९ या शैक्षणिक सत्राची सुरूवात झाली. नविन शाळा , नविन वातावरण , नविन विद्यार्थी , नविन पालक आणि नविन सहकारी ! आमची इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची शाळा दोन ठिकाणी भरायची. शाळेत मुख्याध्यापकांसह एकुण सात शिक्षक कार्यरत होते. यापैकी इयत्ता १ ली ते ४ थी चे काही वर्ग गावातील जुन्या इमारतीत तर ५ वी ते ७ वीचे वर्ग माळावरच्या नविन इमारतीत भरायचे. त्यामुळे शालेय कामकाजात अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागायचे. कुठलाही कार्यक्रम घ्यायचा झाल्यास त्यात विस्कळितपणा यायचा. . त्यामुळे मुख्याध्यापकांसह आम्ही सर्व शिक्षकांनी मिळुन शाळेत एकसंधपणा येण्यासाठी सर्व वर्ग माळावरच्या इमारतीत एका छताखाली भरवायचा निर्णय घेतला. याठिकाणी प्रशस्त मैदान आणि पुरेशा वर्गखोल्या आहेत.

शाळेचा व्हरांडा उघडा असल्याने पावसात परिपाठ किंवा एखादा कार्यक्रम घेताना अडचण व्हायला लागली. एखाद्या वर्गात कार्यक्रम घ्यायचा असल्यास मुले कोंडल्यासारखे बसवावी लागायची. त्यामुळे या अडचणीवर मात करण्यासाठी सर्व शिक्षकांनी मिळुन खालील इमारतीच्या व्हरांड्याचा पत्रा काढुन तो या इमारतीच्या व्हरांड्यात लावण्याचा निर्णय घेतला. आणि चार दिवसातच संपूर्ण पत्रा बसवून झाला. कमी पडलेला पत्रा विकत आणुन घालण्यात आला. यामुळे एका वर्गाची बसायची कायमची सोय झाली. तसेच दैनंदिन परिपाठ आणि शाळेतील विविध कार्यक्रम घेण्यासाठी प्रशस्त व्हरांडा उपलब्ध झाला. ऊन , वारा , पावसात कार्यक्रम घेण्याची सोय झाली.

पावसाचा मार सोसून शाळेचे पूर्वी केलेले रंगकाम शेवटची घटका मोजु लागला होता. अनेक ठिकाणी रंगाचे खपले पडले होते तर काही ठिकाणी शेवाळले होते. शेवाळलेल्या भिंती शाळेतील वातावरण निरूत्साही करत होते. ज्या ठिकाणी मुले ज्ञानार्जन करणार ती जागा / इमारत उत्साह पेरणारी असणे गरजेचे असते. अन्यथा शिक्षकांची सगळी मेहनत मातीमोल व्हायला क्षणही लागणार नाही. त्यामुळे सर्वांनी मिळुन शाळेचे बाह्यांग सचित्र करण्याचा निर्णय घेतला. परंतु शाळा रंगवून सुशोभित झाली तरी शाळेचा परिसर बंदिस्त नसल्याने रंगकामाचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेवून शाळेच्या इमारतीच्या व्हरांड्याला जाळी मारून बंदिस्त करण्याचा निर्णय घेतला. दोन गळणार्‍या खोल्यांना कोबा करून गळती काढण्यात आली. यावेळी शिक्षकांनी पदरमोड करून सर्व काम दोन तीन महिन्यात पूर्ण केले. या संपूर्ण प्रवासात शाळा व्यवस्थापन समितीची मोलाची साथ लाभली.

शाळा रंगवून तयार झाली. शाळेच्या भिंती , व्हरांडे बोलके झाले. मुलांना पावसाळ्यात छत्र्या , रेनकोट अडकवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था व्यवस्था करण्यात आली. हॅंडवाॅश स्टेशन सुसज्ज करण्यात आले... आता मुलांनाही आपल्या शाळेचं बदललेलं रूप आवडायला लागलय........... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा