उपवासाचं खाणं
## उपवासाचं खाणं ## ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ उपवास म्हणजे सर्वसामान्यांसाठीचा ईश्वरभक्तीचा सर्वात जवळचा आणि सोपा मार्ग. उपवासात होणारा शारिरीक आणि मानसिक त्रास हा तपच मानला जातो. प्रत्येक धर्मात कमी अधिक प्रमाणात उपवास केला जातो. उपवासाला जसे धार्मिक महत्व आहे. तसेच त्याचे वैज्ञानिक कारणही सांगितले जाते. रोजचे अन्न खाण्याने ठराविक अन्नधान्यावर ताण पडतो तो ताण कमी होण्याच्या उद्देशानेही उपवास केला जातो. उपवास करण्याची रीत धर्मपरत्वे भिन्न आहे. तसे त्याची नावेही भिन्न आहेत. उपवास कुणी साधा तर कुणी कडक करतो. कुणी फलाहार करून , कुणी खिचडी खावून तर कुणी केवळ पाणी पिऊन करतात. काही मंडळी आठवड्यातून ठरावीक दिवस तर कुणी सलग काही दिवस करतात. नवरात्रीत नऊ दिवस , श्रावणात सोमवारचा उपवास तर रमजानमध्ये सलग महिनाभर उपवास केले जातात. काही मंडळी संकष्टि , चतुर्थी , कुणाचा शनिवार तर कुणाचा मंगळवार. आठवड्यातला रविवार सोडला तर जवळ जवळ सर्वच वारांना उपवास केले जातात. यामागे प्रत्येक व्यक्ती आपल्या धार्मिक परंपरा किंवा आपल्या श्रद्धेनुसार उपवास करत असतात. उपवास करतेवेळी उपवासाचे व...