आमरी माय

##  आमरी माय  ##
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

आमरी माय (आजी) बायाबाई. आंबा खानला मोठी पटाईत. माय आंबाकं घातं सकारी सकारी बांधिपर जायशान  खुलं टाकनला हवाधुंदलक पळ्या आंबा बेचशान आणं. अना तपनबेरा पावशी धरशान आंबा सिलन बसं. आंबा सिलता सिलता आंबा केतोबी आंबट रवनां , आंबिकी फोळी खायंबिगर  माय नोहती रवत. मायला आंबट आंबा खाता देख देखनेवालोका दात आंबत. पर मायका दात नोहता आंबत.

आमरं मायकं डिक्सनरीमा बुधवार येव दिवस कवनलां नोहतो जमत. मायकं मामंसुसरोको नाव बु लका चालु होत होतो. ओनं जमानोना मामंसुसरोको नाव लेता नोहतो जमत , ओकलका माय बु लका चालु होणारा कोणताच नाव नोयती लेत. मंग मायला कबी बुधवार कवनको भयव तं माय कशी कवं ,....   " बळेगावकं बजारकं दिवस तोरो मामाजी गावं आवनको से."  ( मन्जे कोणतंबी वाक्य मा बुधवारकं जागं.... "बळेगावको बजारको दिवस " लगावं ) ओकलक आमी बळेगावको बजार कबी देख्या नयी पर बळेगावको बजार बुधवारं भरसे यव आमला पाठ भयगयेतो.

आमरी माय शिकि नोहती पर देखाशिकिलक मायला कामपुरतो हिसाब तोंडपाठ करता आवं. माय जसी हिसोबमा पक्कि होती. तशी माय अर्धी डाक्टरच होती. मायको दवाईको एक थैलाच भरेव होतो. ओकमा मकाका कणिस , सायजिरा , घनफोळका बिजा इनकं संगं बहुतसारा बिजा अना जळि रवत. मायकं जमानोमा आमरंघरं खंडीभर गायी होती. तबं माणूसको डाक्टर भेटजाय पर जनावरको डाक्टर तिरोडा - तुमसरशिवाय नोहता. ओकलक मायकं थैलामा जनावरकी दवाईच जास्त रवत. ( माय मन्जे आमरं घरकी  ढोरडाक्टरच कवोना )

एकान गायला हिरवं चारोलका पोगळी लगीतं माय नांगबोळीकं पारला जायशान पांढरी पिसोंडीको पाला आनशान चरावं. अना मकाकं कणीसकि राख चरावं. दुय दिवसमा गाय टणटणीच होय. मायजवर थैलामा भेंडी , ककळी , दोळका , बगण , मिरची , कोयरा , झुनकी , बरबटी असी सबकी बिजायी सालभर ठेयी रवं. गावमा कोणलाबी बिजाई लगी तं आमरं मायको हात सबला देनला पुळं रवं.

मायला भजनको मोटो छंद. भजनी मंडळमा माय भजन गायेच गाये. मायला भजन तोंडपाठ. नुसता भजनच नयी तं बियाबरपणमा मायको हातको माईक नोहतो सुटत. मंग बियाका गाना कवनला कोणी संगं रवं , नयी तं नोको रवं. माय पायटला दरणला जातोपर बसं त मायको गरो चालुचं. परामा मायनं पात धरीसका गाना चालुच. मायकं गानालका पुरो खेत गजबजाय जाय. खेतमाका झाळं , पाखरू , गवत सब शांत होयशान मायकाच गाना आयकत बशासेत असोच मला लगं. मला कबी कबी मायला एवळा भजन , पराका गाना , जातोपरका , बियाका गाणा कसाकां पाठसेती एकोच नवल आवं. असी मोरी अनपळ माय अजकं जमानोको सिकेलिख्यायनकं पेक्षा मुठभर पुळं होती.......... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा