बोवा

##   बोवा   ##

( "बोवा" या माझ्या झाडीबोलीतील कथेतून )

रस्त्याना फटफटि ढकलत जाणार्‍या देवराम बोवाले रावजी हाका मारू लागला.

" बोवा , इकळं येजाल. थोळा कुटाराचा पोतातं उचलु लागाजी. "

 तसा बोवाना आपली फटफटी रावजीच्या डयलं बायेर लावून तो रावजीलं कुटाराचा पोता उचलु लागला.

" कोटि चालल्यातं पैदल पैदल फटफटि ढकलत ?"

रावजी कुटाराचा पोता धरून शिडीवर चंगत मनला.

" चाललोजी बसटापवर गाळित पेट्रोल भरावलं." असा मनत बोवा आपली फटफटि ढकलत बसटापवर जावालं नयराच्या रस्त्यालं लागला.

देवराम बोवा तसा कायी रावजीचा गनगोत नोय. तो होय , मोठ्या टोलीवरच्या सकरू गोंडाचा मंजला जवाई. बोवा जरी गोंडाचा जवाई असला तरी सार्‍या गावात अना गावातल्या घरा घरात त्याची उठबस होती. कोणालेबी तो आपलाच जवाई वाटे. देवराम बोवा मंजे गावबोवा............... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा