उपवासाचं खाणं
## उपवासाचं खाणं ##
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
उपवास म्हणजे सर्वसामान्यांसाठीचा ईश्वरभक्तीचा सर्वात जवळचा आणि सोपा मार्ग. उपवासात होणारा शारिरीक आणि मानसिक त्रास हा तपच मानला जातो. प्रत्येक धर्मात कमी अधिक प्रमाणात उपवास केला जातो. उपवासाला जसे धार्मिक महत्व आहे. तसेच त्याचे वैज्ञानिक कारणही सांगितले जाते. रोजचे अन्न खाण्याने ठराविक अन्नधान्यावर ताण पडतो तो ताण कमी होण्याच्या उद्देशानेही उपवास केला जातो. उपवास करण्याची रीत धर्मपरत्वे भिन्न आहे. तसे त्याची नावेही भिन्न आहेत. उपवास कुणी साधा तर कुणी कडक करतो. कुणी फलाहार करून , कुणी खिचडी खावून तर कुणी केवळ पाणी पिऊन करतात.
काही मंडळी आठवड्यातून ठरावीक दिवस तर कुणी सलग काही दिवस करतात. नवरात्रीत नऊ दिवस , श्रावणात सोमवारचा उपवास तर रमजानमध्ये सलग महिनाभर उपवास केले जातात. काही मंडळी संकष्टि , चतुर्थी , कुणाचा शनिवार तर कुणाचा मंगळवार. आठवड्यातला रविवार सोडला तर जवळ जवळ सर्वच वारांना उपवास केले जातात. यामागे प्रत्येक व्यक्ती आपल्या धार्मिक परंपरा किंवा आपल्या श्रद्धेनुसार उपवास करत असतात.
उपवास करतेवेळी उपवासाचे विशिष्ट पदार्थ दुकानात , हाॅटेलमध्ये मिळतात. उपवासाला खासकरून साबुदाना , वरीचा तांदुळ (भगर) आणि फळे सुकामेवा यांचा वापर केला जातो. परंतु अलिकडे दुकानांमध्ये उपवासाचे वडे , वेपर्स , चिवडाही मिळु लागलाय. त्यामुळे व्यक्तिपरत्वे उपवासाचे पदार्थ बदललेले दिसताहेत. कुणी म्हणतो साबुदाने पचायला जड असतात म्हणून उपवासाला त्याची खिचडी खावू नये. कुणाला खिचडीसोबत दहि चालतो. तर कुणाला चालत नाही. कुणाला बटाटे चालतात तर कुणाला बटाटे चालत नाही.कुणाला खिचडीत साधं मीठ चालतो तर कुणाला फक्त सैंधव मीठच चालतो. असं मीठाच्या बाबतीतच नव्हे तर उपवासाला खाल्ल्याजाणार्या अनेक पदार्थांच्या बाबतीत कमालिची मतभिन्नता दिसून येते.
त्यामुळे उपवासाला कुठला पदार्थ खावा आणि कुठला पदार्थ खावू नये , हे ठरवताना माझी कायम द्विधा मनस्थिती होते. तसे मी उपवास कमीच करतो. परंतु घरात इतर मंडळी उपवास करतात. त्यामुळे उपवासाला विविध पदार्थांशी घरात गाठ पडतेच. उपवासाला कुठला पदार्थ चालतो आणि कुठला चालत नाही. हे नेमकं कोण ठरवतो तेच नेमकं कळत नाही. किमान माहित असतं तर अशावेळी त्यांचं मार्गदर्शन घेता आलं असतं. कधी कधी अशीही एक शंका येते कि , खाद्यपदार्थ उत्पादित करणारे व्यापारी , हाॅटेल्स , कंपन्यातर ठरवत नसतील ? खरं काय ते देवच जाणे. तरी कुणाकडे माझ्या शंकेचे समाधान असेल तर नक्की कळवा.......... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा