कदम निरंतर चलते जिसके.....

 कदम निरंतर चलते जिसके.....


"पोवारी बोली व संस्कृती" ही आज महाराष्ट्र,मध्यप्रदेश व छत्तीसगड पुरतीच परिचित राहिली नसून जिथे जिथे हा समाज वास्तव्यास आहे तिथे तिथे या बोली व संस्कृतीचे जतन करण्याचे प्रयत्न समाजबांधव करीत आहेत.


आता ही बोली व संस्कृती केवळ श्राव्य राहिलेली नसून ती लिखानाद्वारे पुस्तकबद्ध सुद्धा होत आहे,हि बोलीअभ्यासकांसाठी अतिशय अभिमानाची बाब ठरलेली आहे.


रामायण,महाभारत,श्रीमद्भगवगीता व ग्रामगीता हे महाकाव्य व विशालप्राय दस्तावेज पोवारी बोलीत अनुवादित करण्याचे महत्कार्य पोवारी बोलीचे अर्ध्वयू संततुल्य मा.श्री.जयपालसिंहजी पटले यांनी.


पुढे बर्याच पोवारी साहित्यिकांनी आपली सृजनप्रतिभा जागृत करीत पोवारी कवितासंग्रह,पोवारी दंडार लावणी,पोवारी नवटंकी नाटक,संगीत नाट्यकथालेखन केवळ पुस्तक स्वरूपातच नाही तर रंगभ्मीवरही सादर व्हायला लागले.


स्व.श्री.मनराजजी पटेल यांच्या कवितांचे संगीतबद्ध ध्वनीमुद्रणही गायक श्री.चेतन राणे यांच्या सुमधूर आवाजात मुद्रित झाले.


पोवारीतून कथालेखन हा प्रकार थोडा मागे राहिला होता पण डाँ.ज्ञानेश्वरजी टेंभरे यांनी पोवारी महापुरूष यांचे कथारूपात मांडणी केली.


राष्ट्रीय कवी श्री.देवेंद्रजी चौधरी यांनी "बिजली को बिह्या" हे नवटंकी पोवारी नाटक रचनाबद्ध केले.तर झाडीबोली साहित्यिक व शिक्षक श्री.पालिकचंद बिसने यांनी "वलो वलो भयेव" व "संभलकन रवनो" ह्या दोन अंकी नाटका लिहून सिंदीपार येथे संपन्न झालेल्या राजाभोज जयंती समारोहात सिंदीपार व सालेभाटा येथील महिला कलावंतांनी सादर केल्या.


सृजनशील शिक्षक व महाराष्ट्रातील वर्तमानातील नामवंत शीर्षस्थ कथाकार श्री.गुलाबजी बिसेन यांनी तर पोवारीतील कथांची मालिकाच सुरू केलेली असून "पोवारी इतिहास साहित्य व उत्कर्ष संस्थेद्वारा आयोजित लेखन स्पर्धांमध्यै "बालकथा,बोधकथा," हे प्रकार आठवड्यातून दोनदा आयोजित केल्या जाते.


सोबतच सौ.छाया पारधी,सौ.वर्षा रहांगडाले,सौ.शारदा रहांगडाले अशा सर्जनशील महिला साहित्यिकांनी सुद्धा पोवारी बोलीतील लिखाणांच्या स्पर्धेत आपणही कुठे कमी नाही असे समजत या क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत आहेत.


मराठी साहित्य क्षेत्रातील नामवंत साहित्यिक मा.श्री.अँड.लखनसिंहजी कटरे यांनीसुद्धा मागील काही वर्षांपासून स्वतःला पोवारी बोलीच्या उत्थान व उत्कर्षासाठी झोकून दिले आहे.


नागपूरातील प्रतिष्ठित बि.एड.काँलेजचे प्राध्यापक डाँ.शेखरामजी येळेकर यांनीसुद्धा पोवारी बोलीतील साहित्य संवर्धनासाठी आपली महत्वपूर्ण भूमिका वठविणे सुरू ठेवले आहे.


नागपूरातीर कर आकादमीमध्ये कार्यरत आतिरिक्त आयुक्त श्री.ऋषीजी बिसेन सर व सुविद्यपत्नी सुद्धा पोवारी लेखनस्पर्धांमध्ये हिरिरीने सहभागी होतात.


आज घडीला जवळपास दिडशे विषयांवर काव्यस्पर्धा,पन्नासच्या जववपास अन्य गद्यलेखन स्पर्धा आयोजित करत साहित्य निर्मिती प्रचंड प्रमाणात झालेली असून रोजच्या रोज ती वृंद्धिंगत होत आहे.


पन्नासच्या जवळपास बालसाहित्यिक ते ज्येष्ठ साहित्यिक असा सर्व वयोगटातील साहित्यिक वर्ग आज आपले विहित कार्य सांभाळत हे करतो आहे.हे नसे थोडके !


कु.रक्षा ठाकरे,कु.कल्याणी पटले सारख्या बालसाहित्यिका या बोलीसंवर्धन चळवळीचे भविष्य ठरत आहेत.हे अतिशय अभिमानास्पद असे दृश्य आम्हासाठी आहे.


बोली ही साहित्य स्वरूपातच टिकवून ठेवली जावू शकते यासाठी आपल्या सृजनकळा व्यक्त करत निर्माण झालेली ही साहित्यसंपदा मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.


काल एका अशाच साहित्यिक संमेलन कार्यक्रमात पोवारी संस्कृतीचे वाहक मा.श्री.हिरालालजी बिसेन मु.धानोरी जि.गोंदीया या मूळ गावचे व मागील बर्याच वर्षांपासून व्यवसाय धंद्यासाठी नागपूरात स्थायिक असूनही अपली मायबोलीविषयक कर्तव्य नेटाने पार पाडत आहेत.


प्रस्तुत कथासंग्रह हा त्यांच्या समृद्ध साहित्यिक वारशाची प्रचिती करवून देतो.नागपूरसारख्या महानगरात प्रथम पाऊल ठेवताच किती भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागले.अशा कठिन प्रसंगीही आपले कार्य प्रामाणिकपणे करीत असताना सुद्धा त्यांना सृजनाची मैत्री लाभते,किती जोरदार समर्पकता ना !!!


स्वतः लेखक महोदयांनीच मला हा कथासंग्रह भेट म्हणून दिला.घरी येताच हाती घेऊन एक एक कथा वाचताना आपल्या बालपणीचे ते हलाखीचे जीवन डोळ्यापुढे तरळू लागले.


असे हे बोलिमाहात्म्य अतुलनीय आहे.याला तोड नाही.

असे अनेकानेक साहित्य रोजच्यारोज निर्माण होत आहे.


     !!जय जय सृजनशक्ती,जयतू जय बोली महती!!


---->रणदीप कंठीलाल बिसने

(महाराष्ट्रातील बोली अभ्यासक,रंगभूमीपूजक शिक्षक )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा