मुलांना वाचनानंद देणारा वाचनसखा

 मुलांना वाचनानंद देणारा वाचनसखा


वर्गात प्रविष्ट होणारे प्रत्येक मूल हे भिन्न परिस्थितीतून, भिन्न वातावरणातून आलेला असतो. सोबतच वर्गातील प्रत्येक मुलाची बौद्धिक क्षमता कमी जास्त असते. त्याचा एकंदरीत परीणाम मुलांच्या क्षमता विकासावर होत असतो. सर्व मुलांच्या त्या वर्गातील सर्व क्षमता एकासोबत विकसित होतील असेही नाही. त्याचाच विचार करून मुलांची वाचन क्षमता विकसित करताना येणारे अडथळे दूर करत मुलांना आनंददायी पद्धतीने वाचनाकडे वळवण्यासाठी जि. प. वरीष्ठ प्राथमिक शाळा भरैगाव , ता. देवरी , जि. गोंदिया येथे कार्यरत असलेले उपक्रमशिल शिक्षक, आमचे मित्र सदाशिव निळकंठराव पाटील हे "वाचनसखा" हे त्यांच्या लेखनीतून साकारलेले पुस्तक घेऊन आले आहेत.


वाचनाचा पहिला टप्पा चित्रवाचन. या चित्रवाचनाच्या माध्यमातून पुस्तकामध्ये मुळाक्षरांची ओळख करून दिली आहे. सोबतच लेखन सरावासाठीही जागा दिली आहे. वाचन क्षमतेवर असणारी लहान मुले चित्रांकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे मुलांच्या परिसरातील, परीचीत चित्रांचा यात कल्पक योजना केलेली आहे. एकुण ३१ पाठांमध्ये मुळाक्षरांपासून चौदाखडीपर्यंतची ओळख करून देण्यात आली आहे. यामध्ये स्वर, व्यजन , जोडाक्षरे, उतारा वाचन यासोबतच वाचनाचा आनंद देणार्‍या गोष्टी, म्हणी उलट अर्थाचे शब्द, समान अर्थाचे शब्द, प्राणी, पक्षी, फळे , झाडे, भाज्या यांचा सचित्र समावेश केलेला आहे.


वाचनाच्या प्राथमिक टप्प्यावर असणार्‍या तसेच वाचनात गती कमी असणार्‍या मुलांसाठी हे पुस्तक खुपच उपयुक्त आहे. ज्ञानसंवर्धन प्रकाशन, कोल्हापूरने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. मुलांना वाचनाकडे घेऊन जाताना आनंददायी पद्धतीने वाचनानंद देणारा हा "वाचनसखा" मुलांचा आवडता मित्र ठरेल यात शंका नाही.


पुस्तकाचे नाव - वाचनसखा

लेखक - सदाशिव निळकंठराव पाटील

मूल्य - ५० रू.

प्रकाशक - ज्ञानसंवर्धन प्रकाशन, कोल्हापूर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा