पोवारी कथा - बोली
पोवारी कथा - बोली
लेखक - गुलाब रमेश बिसेन
मु. सितेपार , ता. तिरोडा , जि. गोंदिया.
मो. नं. 9404235191
ई मेल - gulab0506@gmail.com
टॅक्टरकं आवाजलक बिरज उठेव. बल पेटायस्यान भीतपरकं घळीमा देखन बसेव. पायटंका पाचपरा घळीका काटा बस्या होता.
"कोठी आयेतजी बोरे ?" येनं आवाजलक वू उठस्यान बाहेरकं सपरीपर आयेव.
"हे खालतच्या सपरीवरच आहेत." तसा हमाल एकएक धानका बोरा उचलस्यान टालीमा भरण बस्या.
चुरणो होयस्यान हप्ता भयी रहे. टॅक्टर नही मिलेलक घरचं बोराकी छल्ली लगायस्यान टॅक्टरकी बाठ देखत एक हप्ता चली गयेव. बिरजको मोठो टुरा नागपूरकं काॅलेजमा सिकत होतो. गये मयनामा काॅलेजकी फी भरणसाती वोनं आपलं मोठं सारोकनलक सात हजार उचलीतीस. बरसातमा परापाणीसाती उचलेव सोसायटीको कर्जाको ब्याज बढत होतो. धान कटाईपासून चुरणोवरीको खर्चा देनो बाकी होतो. येनं सबको मनमा बिचार करतच बिरज नास्ता करस्यान गंजपर जानला नाकलेव. संगमा गावमाका दुयच्यारझन होताच. सबजन टॅक्टरपर बसस्यान निकल्या.
गंजपर दलालका हमाल बाठच देखत होता. हमालयीननं बोरा उतरायस्यान ढेरी लगायीन. बोलीला बेरा होती. बिरज आपलं संगवालयीनसंगं ढेरीजवर बसस्यान बोलीकी बाठ देखत बसेव.
"बिरज भाऊ, कोणतो धान आनेसगा ?" ढेरीमा हात टाकत दलाल बोलेव.
"जयश्रीराम आयजी."
"का रेट सेजी आबं ?" भिकरामनं दलालला बिचारीस.
"काल पच्चीसव होतो. अज मालूम नही. हररोज रेट बदलतो रवसे." दलाल बोलेव.
"अज मालतं बहुत दिसरहीसे!" बिरज भोवत्याल नजर घुमावत बोलेव.
"मंग रेट कम रहे अज. तरीबी देखुसु. साजरोसे तुमरो धान." असो कवत दलाल दुसरं कास्तकारकन चलतो भयेव.
धानकं रेटकं बिचारलक बिरज चिंतामा पळेव. वोला डोरापुळं सारोका पैसा, सोयटीको ब्याज, चुरणीको खर्चा एकसारखो चोवत होतो. बिरजला चिंतामा पळेव देख भिकराम बोलेव.
"साजरो रेट भेटे. चिंता नोको करूस. आपलं कास्तकारकी मेहनत करे मुर्गा अना अंडा खाये फकीर येकंसारखी गत से गा. अनाज पाकावनं कास्तकारनं अना रेट ठरावनं बेपारयीननं."
"पच्चीस छब्बीसवतरी रेट मिले पायजे भाऊ."
"हो ना."
बिरज अना भिकरामकं बातचीतकं बिचमाच गंजमा अचानक भीळ बढी. बेपारीयीनको आवाज आवन बसेव. "दोन हजार दोनशे दाहा. दोनहजार दोनसे पन्नास."
तसो बिरज जादाच चिंतामा पळेव. आपलं धानकं ढेरीला दुयी हातलक सवारन बसेव. एक एक करत बोयी बिरजकं ढेरीपर आयी. बोली चालु भयी.
"एकवीससे एक." दलाल पुकारन बसेव. तसो बिरज सटपटान बसेव. वोकी धडकन तेज होन बसी. अज धानला रेट साजरो नही मिलेव तं बिरजका पूरा गणित बिघळेबगर रवनार नोहता. बोली चढन बसी "पच्चीसव बीस." "पच्चीससव पचास." "छब्बीससव." आखीर बोली रूकी. ढेरीपर छब्बीससव अना बेपारीको नावकी चिठ्ठी खोसस्यान दलाल निकल गयेव. तसो बिरजको उदास चेहरा खुलेव. वू धानकं ढेरीपर हात फिरावत सालभरकं मेहनतकी किमतकं चिठ्ठीकन देखत बसेव.
- गुलाब बिसेन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा