कविता - आमची झाडीपट्टी

 आमची झाडीपट्टी


आमची झाडीपट्टी

झाडा झुळपाची

बांद्या खोबर्‍याची

तर्‍या बोळीची

गावखारीची


आमची झाडीपट्टी

देशी खेळाची

शंकरपटाची

मोवरानाची

तान्यापोर्‍याची


आमची झाडीपट्टी

दंड्यार नाटकाची

कवी लेखकाची

भवभूतीची

झाडी गोंडीची


आमची झाडीपट्टी

वैनामाईची

धाना तुरीची

लाखोरी जवसाची

वेरू वास्त्याची


आमची झाडीपट्टी

ढोडी नाल्याची

रेती मातीची

ढुड्डी पोर्‍याची

फणस बोराची


आमची झाडीपट्टी

चक्रधराची

मुकुंदराजाची

पोवारी बोलीची

नागझिर्‍याची


( ता. क. मित्रहो, जसा मनात आला तसा लिवलु. वाचून गोळ मानुन घ्या बाबा.)


- गुलाब बिसेन (9404235191)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा