वास्तवातील सुपरहिरो

वास्तवातील सुपरहिरो


घरातली लहान मुले बर्‍याचदा दूरदर्शनवरच्या विविध मालिका बघुन आपल्या आवडीच्या सुपरहिरोचा ड्रेस हट्ट करून घेवून मागतात. तो हौसेने घालुन सुपरहिरो चा खेळ खेळत बसतात. त्यांचा तो खेळ बघुन घरच्यांना त्यांचे कौतुक वाटते. लहान मुले टिव्हीतलं बघुन ते वास्तवात करण्याचा प्रयत्न करतात. पण ते ज्या सुपरहिरोच्या शोधात असतात तो सुपरहिरो वास्तवात कधी अस्तित्वाच आलेला नाही. हे त्यांना कुठं ठावूक ! बालमन आपल्या कुवतीप्रमाणे विचार चक्र फिरवून ते खेळात गुंतुन जातात.

चित्रपट , मालिका या आभासी जगातून नेहमी दिसणारे सुपरहिरो मुळात वास्तवात अस्तितवातच नसतात. मनोरंजनापुरते त्यांचं अस्तित्व असतं. पण लहान मुले कधीकधी आभासी जगालाच वास्तव जग समजुन त्यात वावरत असतात. लहान मुलांचा हा सुपर हिरो नेमकं काय करतो ?...... तो संकटात सापडलेल्या दिनदुबळ्यांना मदत करतो. दुबळ्यांची इतरांकडुन होणारी पिळवणूक थांबवतो. सर्वसामान्यांची काळजी घेतो. गरजुंना मदत करतो. निराधाराला आधार देतो. आंधळ्याला काठी देतो. एकंदरीत सर्वसामान्यांची तो सदैव काळजी घेतो.

असेच सुपरहिरोसारखे काम वास्तवात करणारेही अनेक मंडळी आपल्या अवतीभवती अस्तित्वात असतात. कुष्ठरोग्यांची सेवा करणारे बाबा आमटे , आदिवाशींची सेवा करणारे डाॅ. अभय आणि राणी बंग , लहान मुलांची बालकामगारीतून सुटका करणारे सत्यार्थी असतील किंवा डाॅ. प्रकाश आणि मंदाकिणी आमटे असतील. हे वास्तवात सुपरहिरोसारखे काम करत आहेत. ते टिव्ही मालिकांतून रोज झळकत जरी नसले तरी त्यांचे कार्य हे दिनदुबळ्यांना जिवण देणारे आहे. त्यामुळे या खर्‍याखुर्‍या सुपरहिरोंची ओळख लहान मुलांना होणे जरूरी आहे.

वास्तवातील असंख्य सुपरहिरो आपल्या अवतीभवती नानाविध मार्गांनी समाजाची सेवा करत आहेत. त्यांची ओळख बालवयात मुलांना झाली तर त्यांच्यातूनही एखादा रिअल सुपरहिरो नक्की घडेल. असा आशावाद आपण नक्की बाळगु शकतो..........गुलाब बिसेन ९४०४२३५१९१

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा