जपूया निसर्ग
जपूया निसर्ग
नुकताच आमच्या शाळेचा वनभोजन पार पडला. शाळेपासून पाच सहा किमी अंतरावर अलसलेले नांदारी डॅम. निसर्गाने मूक्तहस्त केलेली उधळण आणि तलावाचे नितळ निळे पाणी कुणालाही प्रेमात पडायला लावते. अशा निसर्गरम्य ठिकाणी अमाप उत्साहाच्या तुषारांनी चिंब भिजुन या वनभोजनाचा सर्वांनी आनंद लुटला. निसर्गाच्या सानिध्यात असताना मनावरील मरगळ कुठल्या कुठे पळून जाते. शरीरात उत्साहाचा संचार होतो. नवउर्जेने उर्जीत झालेले मन पुढिल अनेक दिवस ताजेतवाने राहते.
नांदारी सारख्या निसर्गरम्य ठिकाणी निसर्गाशिवाय दुसरं काहिही दृष्टिस पडुच नये असं वाटतं. निसर्गात फिरायला जाताना काही नियम पाळणे आवश्यक असते. निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. याची काळजी घ्यावी लागते. निसर्गाकडुन भरभरून घेताना त्याला देण्याचीही जाण ठेवावी लागते. परंतु माणूस नावाच्या प्राण्याने अशा निसर्गरम्य ठिकाणी आपल्या विघातक कार्याचा ठसा उमटवला आहे. या परीसरात फेरफटका मारल्यावर याचे पुरावे आपल्या दृष्टिस पडतात. मद्याच्या रिकाम्या बाटल्या , अस्ताव्यस्त पडलेल्या प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या , पिशव्या निसर्गाचे विदृपिकरण करत आहेत.
सगळिकडे पसलेली हिरवाई आणि त्यात तलावाचं नितळ निळं पाण्यात आपलं प्रतिबिंब पहावं. निसर्गाने रेखाटलेल्या चित्रांच रेखाटन डोळ्यात भरून घ्यावं. निसर्गाच्या निर्मीतीला मोकळ्या मनानं दाद द्यावी. परंतु आजची चंगळवादी मानवी वृत्ती निसर्गाच्या मुळावर उठत आहे. अती मानवी हस्तक्षेप निसर्गाचे नियम धाब्यावर बसवून त्याचे स्वास्थ बिघडवत आहे. निसर्ग जपणे हि प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. चला तर मग आपला निसर्ग आपणच जपूया...........गुलाब बिसेन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा