वर्तमानपत्र बनले कलेचा स्रोत

वर्तमानपत्र बनले कलेचा स्रोत

(माझं कलापूर , माझी कलाकृती)

आपल्याघरी रोज वर्तमान घेवून येणारं वर्तमानपत्र अनेकांच्या जिवणाचा अविभाज्य अंग बनलेला आहे. दिवसाची सुरूवात वर्तमानपत्र वाचनाने करणारेही बहुसंख्य आहेत. अनेकांनातर वर्तमानपत्राशिवाय सकाळचा चहाही घशाखाली उतरत नाही. असा हा वर्तमानपत्र दुसर्‍या दिवशी मात्र थेट रद्दित जावून पडतो. मग मात्र या वर्तमानपत्राचा वापर हा दुकानात पुड्या बांधण्यासाठी होतो. अशा वर्तमानपत्राच्या रद्दिचा कल्पक वापर करून मी आपले घर समृद्ध करणार्‍या चित्रमय पुस्तकांची निर्मिती केली आहे.

असे म्हटले जाते कि , सौंदर्य हे वस्तूत नसून ते बघणार्‍याच्या नजरेत असते. आपल्या सभोवती अशा असंख्य वस्तू असतात ज्यांच्यामधून आपण अनेक अाकर्षक कलाकृतींची निर्मीती करू शकतो. फक्त गरज आहे ती कल्पक दृष्टिची. रोज वाचल्या जाणार्‍या वर्तमानपत्राच्या बाबतीतही तसेच आहे. वर्तमानपत्रात विविध सण उत्सव , कला , संस्कृती , निसर्ग , भूकंप , पूर , अवकाश , प्राणी , पक्षी , ग्रामिण जीवन अशा असंख्य विषयांशी संबंधित प्रसंग दैनंदिन जिवणात कॅमेराबद्ध करून ते छायाचित्र स्वरूपात वर्तमानपत्रांमध्ये वेळोवेळी प्रकाशित केले जातात. अशा छायाचित्रांचे संकलन करून त्यापासून चित्रमय पुस्तकांची निर्मीती मी केली आहे.

यासाठी वर्तमानपत्रातील छायाचित्रांचे विविध विषयानुसार विभागणी केली. त्यानंतर ए फोर आकाराच्या झेराॅक्स कागदांच्या बायडिंग केलेल्या वहित चिकटवून चित्रमय रंगीत पुस्तकांची निर्मीती केली. वर्तमानपत्राचा कागद हा पातळ असल्याने ते चिकटवताना विशिष्ट प्रकारच्या डिंकाने चिकटवून दोन दिवस त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. शिवाय कलात्मकतेने छायाचित्रे चिकटुन पुस्तके अधिक आकर्षक आणि बोलके करता येतात. 

आतापर्यंत मी वर्तमानपत्राच्या रद्दितून ग्रेट भेट , क्रीडांगण , विश्व , अंबाबाई , किलबिल , पुस्तकायन , चिंटु अशा विभिन्न विषयांवर सुमारे पन्नास पुस्तकांची निर्मीती केली आहे. वर्तमानपत्राच्या वाचनातून सुरू झालेला प्रवास मला चित्रमय पुस्तकांपर्यंत घेवून आला. या चित्रमय पुस्तकाची निर्मीती करणे हा माझा छंद झाला असून माझ्या नजरा वर्तमानपत्रामधिल असे सौंदर्य सदैव टिपत असतात. त्यातून मी सदैव नवर्निर्मीती करत राहतो. या छंदामुळे माझे घर चित्रमय पुस्तकांचे समृद्ध दालन कधी बनले हे कळलेच नाही.

- गुलाब बिसेन , कोतोली , ता. पन्हाळा , जि. कोल्हापूर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा