अहो
अहो.......
भार्गवला शुक्रवार आणि शनिवार अशी दोन दिवस सुट्टि असल्याने तो शुक्रवारला (दि.१३/१२/२०१९) माझ्यासोबत माझ्या शाळेला आला होता. शाळेत प्रवेश केल्यापासून तो बिनधास्त वावरत होता. मुलांच्या गराड्यात तो आनंदात मुक्त संचार करत होता. दिवसभर नुसती मस्ती सुरू होती. या वर्गातून त्या वर्गात , आत बाहेर नुसता धुंडाळा सुरू होता. त्याच्या शाळेत असे स्वातंत्र्य त्याला अभावानेच मिळत असल्याने तो अधिक मूक्तपणे वावरत होता. मुलांच्या सोबत जेवणाचा आनंदही त्याने लुटला.
दिवसभराच्या धावपळीप दिवस कसा संपला हे त्याला कळलेच नाही. भार्गव घरी पोहचला तेव्हा पूर्ता थकला होता. रात्री झोपताना त्याच्या मम्मीने दिवसभराच्या मौज मजेचा मागोवा घेताना भार्गव म्हणाला ,
" मम्मा , पप्पांच्या शाळेतील मुलांना तुमचे आणि पप्पांचे नावच कळत नाहीत."
" बेटा , तु आमचे काय नाव सांगितले मुलांना ? " मम्मीने कुतुहलाने विचारले.
" मम्मा , मी मुलांना तुमचे नाव "दुर्गा" आणि पप्पांचे नाव "अहो" असे सांगितले. पण मुलांना काही कळतच नव्हते."
भार्गवचे हे बोल ऐकुण आम्ही एकमेकांकडे बघत मोठ्याने हसु लागलो.......गुलाब बिसेेन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा