नव शिक्षक घडवताना…...
नव शिक्षक घडवताना…... सध्याचा काळ हा अनेक अंगाने संक्रमणाचा काळ आहे. या काळामध्ये रोज नवे घडत आहे. या नवे घडण्याची गतीही अफाट वेगाने वाढते आहे. काल ज्या संकल्पना आपले मूळ रोवून खांबाप्रमाणे घट्ट उभ्या होत्या, त्या आज उन्मळून पडल्या आहेत. जग रोज बदलतंय. या जगात रोज नवं घडत आहे. विद्यार्थी शिक्षक यांच्यातील नातं या तंत्रज्ञानाच्या काळात बदलत चाललेलं आहे. वर्गातील विद्यार्थी हा केवळ शिक्षकाकडूनच शिकत नाही, तर त्याच्या सभोवती असलेलं निसर्गरुपी पुस्तकही त्याला शिकवतच आहे. सोबतच इंटरनेटचं मायाजाल त्याला नवनवे रोजच काही ना काही शिकवत आहे. अशा विद्यार्थ्यांना रोजच सामोरे जाणारा शिक्षकही अपडेट असणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी शिक्षकांनी जुनी परंपरागत शिक्षणाची पांघरलेली झूल उतरून नव तंत्रज्ञानाची कास धरणे ही काळाची गरज झाली आहे. अशा दिवसेंदिवस आव्हानात्मक ठरत चाललेल्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी नव शिक्षक घडवणे गरजेचे ठरते. मग तो घडेल तरी कसा? यासाठी दोन पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे ठरेल. व...