सर , आम्ही तुमच्यासोबत थांबु ?
००० सर , आम्ही तुमच्याबरोबर थांंबु ? ००० उन्हाचा कडाका दिवसेंंदिवस वाढतच चाललाय. शाळेत परीक्षा संंपून निकाल तयार करायची लगबग सुरू आहे. असे असले तरी मुले शाळेला नियमीत येतच आहेत. आजही माझ्या वर्गातील उपस्थिती १००% होती. मुलांंचे जेवण होवून थोळावेळ वर्गात स्थिरावली. उन्हाचा जोर वाढतच होता. त्यामुळे या चिमुरड्यांंना उन्हाच्या झळा लागायला नको म्हणून मी आज थोडा लवकरच घरी सोडले. मुलांंना सोडुन मी वर्गात बसून निकालाचे काम करू लागलो. एवढ्यात इयत्ता ४ थी तील करण व सुमीत दारात आली आणि एका सुरात म्हणाली , " सर , आम्ही तुमच्याबरोबर थांंबु ?" मी त्यांंच्याकडे बघितले. त्यांंच्या चेहर्यावरील निरागस भाव बघुन मलाही त्यांंना नकार देता आला नाही. मी " बसा " म्हणताच दोघेही आनंंदाने वर्गात त्यांंच्या जागेवर जावून बसले. माझे काम सुरु असल्याने मी त्यांंना वर्गातील गोष्टिंंची पुस्तके वाचायला सांंगितली. दोघेही शांंतपणे पुस्तक वाचत बसलीत. बर्याचदा प्रशिक्षणांंध्ये मुलांच्या शाळेला येण्यावर एक कमेंंट केली जाते. ती म्हणजे " मुले शाळेला येताना हळुहळु किंंवा रडत येतात. घरी जाताना ,सु...