अर्थज्ञानी स्वप्निल

००० अर्थज्ञानी .......स्वप्निल ०००

काही महिन्यांंपूर्वी मी माझ्या शाळेशेजारच्या शाळेत तेथील शिक्षक रजेवर गेले असताना , एक दिवसासाठी शाळा सांंभाळायला गेलो होतो. शाळेत गेल्यावर परीसर स्वच्छता , परीपाठ ही नित्याची कामे करून वर्गात जावून  हजेरी घेतली. हजेरी घेवून होताच , इयत्ता 2 रीत शिकणारा  स्वप्निल त्याच्या मित्राला घेवून माझ्याजवळ आला . स्वप्निल त्या शाळेतला चुणचुणीत विद्यार्थी. स्वभावाने विनम्र आणि चेहर्‍याने गोड.   मी त्याला काही विचारण्याच्या आतच तो मला म्हणाला , " सर , तुमच्याकडे रूपे कार्ड आहे ? " जिथे अजुन मोठ्या माणसांंना रूपेकार्ड म्हणजे काय ? हे कळत  नाही , तिथे या चिमुकल्या स्वप्निलच्या अनपेक्षित प्रश्नाने क्षणासाठी मी भांंबावुनच गेलो. स्वत:ला सावरत म्हणालो , " का रे ?" " सर , रूपेकार्ड असले की माझे पप्पा पैसे देतात." स्वप्निल उत्तरला. रूपेकार्ड आणि पैशांंची काय भानगड आहे , हे मला काही कळेना.

हे कोडंं उलगडण्यासाठी मी स्वप्निलकडून त्याच्या पप्पांंकडे मिळणार्‍या पैशांंची माहीती घेवू लागलो. तो मला सांंगु लागला. " सर , माझ्या पप्पांंकडे लयी पैसे हायतंं . ते गावातल्या लोकांंना पैसे देतात. माझ्या पप्पांंकडून वेगवेगळ्या अकरा बॅॅंंकांंतील पैसे काढता येतात. त्यासाठी गावातली माणसंं बॅॅंंकेचंं पासबूक घेवून येतात. सर , माझे पप्पा तुम्हालाही पैसे देतील ." मी म्हणालो , " मला किती पैसे मिळतील ?"  " सर , एकावेळी दोन हजार मिळतील. " स्वप्निल उत्साहाने सांंगत होता. थोडा वेळाने तो मला माझे बॅॅंंकेतील पैसे त्याच्या पप्पांंकडून पैसे काढण्याची विनंंती करू लागला. मला पैशांंची गरज नसल्याने  त्याची   समजूत काढत मी म्हणालो , " माझ्याकडे बॅॅंंकेत एकही पैसे नाहीत. त्यामुळे तुझे पप्पा मला पैसे देणार नाहीत. " परंंतु माझा हा युक्तीवाद त्याला पटेना. सरांंच्या खात्यावर एकही पैसे नसने  त्याच्या बालमनाला न पटणारे असल्याने त्याने मला माझे एटिएम कार्ड बघायला मागितले. मी त्याला माझे तीन विविध बॅॅंंकांंचे कार्ड्स दाखवताच , एक कार्ड हातात घेत तो  म्हणाला , " सर , हा युनियन बॅॅंंकेचा रूपे कार्ड आहे."  या २रीतील चिमुकल्याचे हे बॅॅंंकिंंगचे ज्ञान बघुन मला आश्चर्याचा धक्काच बसला. मोठ्यांंना बॅॅंंकेचंं स्लिप भरायची कशी हा प्रश्न आजही पडत असताना स्वप्निलचे यावयातील हे ज्ञान वाखानण्याजोगे आहे.

हा नोटाबंंदिनंंतरचा लगतचा काळ होता. सगळीकडे चलन टंंचाई असल्याने बॅॅंंकेतून पैसे काढण्यावर अनेक निर्बंंध होते. स्वप्निलचे वडील बॅॅंंकेचे ग्रामीण प्रतिनिधी असल्याने गावातील मंंडळी आपले आर्थिक व्यवहार त्यांंच्यामार्फत करायचे. बॅॅंंकेत दिवसभर रांंगांंत उभे राहण्यापेक्षा गावातल्या गावात पैसे काढणे सोयीचे असल्याने गावकर्‍यांंची स्वप्निलच्या घरी वर्दळ असायची. घरी चालणार्‍या बॅॅंंकेच्या व्यहाराच्या दैनंंदिन निरीक्षणातून स्वप्निल हे सर्व शिकला. यासाठी स्वप्निलच्या निरीक्षण शक्तीला नक्कीच दाद द्यावी लागेल.................... गुलाब बिसेन ( ९४०४२३५१९१ )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा