सर , आम्ही तुमच्यासोबत थांबु ?

००० सर , आम्ही तुमच्याबरोबर थांंबु ? ०००

उन्हाचा कडाका दिवसेंंदिवस वाढतच चाललाय. शाळेत परीक्षा संंपून निकाल तयार करायची लगबग सुरू आहे. असे असले तरी मुले शाळेला नियमीत येतच आहेत. आजही माझ्या वर्गातील उपस्थिती १००%  होती. मुलांंचे जेवण होवून थोळावेळ वर्गात स्थिरावली. उन्हाचा जोर वाढतच होता. त्यामुळे या चिमुरड्यांंना उन्हाच्या झळा लागायला नको म्हणून मी आज थोडा लवकरच घरी सोडले. मुलांंना सोडुन मी वर्गात बसून निकालाचे काम करू लागलो. एवढ्यात इयत्ता ४ थी तील करण व सुमीत दारात आली आणि एका सुरात म्हणाली , " सर , आम्ही तुमच्याबरोबर थांंबु ?" मी त्यांंच्याकडे बघितले. त्यांंच्या चेहर्‍यावरील निरागस भाव बघुन मलाही त्यांंना नकार देता आला नाही. मी " बसा " म्हणताच दोघेही आनंंदाने वर्गात त्यांंच्या जागेवर जावून बसले. माझे काम सुरु असल्याने मी त्यांंना वर्गातील गोष्टिंंची पुस्तके वाचायला सांंगितली. दोघेही शांंतपणे पुस्तक वाचत बसलीत.  बर्‍याचदा प्रशिक्षणांंध्ये मुलांच्या शाळेला येण्यावर एक कमेंंट केली जाते. ती म्हणजे " मुले शाळेला येताना हळुहळु  किंंवा रडत येतात. घरी जाताना ,सुटलो एकदाचा ,या भावनेने पळत घरी जातात " इथे मात्र चित्र याच्या अगदि उलट दिसत होते.... मुले घरी जाण्यापेक्षा शाळेत थांंबायला अधिक उत्सुक होती..  हे सर्व घडत असताना अनेक प्रश्नांंनी माझ्या डोक्यात काहुर माजवण्यास सुरूवात केली ..... मुलांंना एवढ्या उकाड्यातही माझ्यासोबत का थांंबावेशे वाटले ? घरी जावून इतर मुलांंप्रमाने खेळण्याचा मोह त्यांंना का झाला नाही ? आपण घरी लवकर न जाता शाळेत सरांंसोबत थांंबावे असे त्यांंना का वाटले ? असे एक ना अनेक प्रश्न मला पडत होते. हे प्रश्न सध्या अनुत्तरीत असले तरी मुले माझ्यासोबत मी जाईपर्यंंत थांंबलीत याचा मला मनस्वी आनंंद झाला................गुलाब बिसेन ( ९४०४२३५१९१ )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा