सितेपारचा शिमगा

००० सितेपारचा शिमगा ०००

निसर्गाने मुक्तहस्ते केलेली रंंगांंची उधळण , घाणमाकडीचा किर्र किर्र आवाज आणि रात्री उशीरापर्यंंत चंंद्राच्या शितल प्रकाशात चालणारे पोराबारांंचे , आयामायांंचे पारंंपारीक खेळ या सर्वांंच्या  मिलाफाने सितेपारच्या शिमग्याला वेगळाच रंंग यायचा.

शिमग्याची चाहुल लागली की गावातील शाळकरी पोराबारांंची घाणमाकडी तयार करायची तयारी सुरु व्हायची. घाणमाकडीसाठी पळसाच्या किंंचीत वाकलेल्या  खांंद्याचा शोध सुरु व्हायचा. कारण पळसाच्या मउपणामुळे घाणमाकडी मोडायची शक्यता कमी व्हायची. असा लाकुड सापडल्यावर त्याला कुर्‍हाडीने थोडी खाच पाडुण त्याला जमीनीत गाडलेल्या खुंंटावर ठेवले की झाली घानमाकडी तयार.मग काय ? संंध्याकाळ झाली की , मुले आपापल्या शेजार बेठारातल्या घाणमाकडीवर स्वार होवून खेळाचा आनंंद लुटायचे.अशा सितेपार गावभरात आठ दहा घाणमाकड्या असायच्या.

घाणमाकडीच्या खेळासोबतच "डंंडा" हा खेळ खेळला जायचा. मंंदिरजवळचा डंंडा गावात फेमस होता. मातीच्या रस्त्यावर पाण्याने तर कधी चुलीतील राखेने उभ्या आडव्या रेषा ओढुन मैदान तयार व्हायचा. दोन संंघात हा खेळ चुरशीने खेळला जायचा. या खेळांंना होळी पूर्वी पंंधरा ते वीस दिवस आधी सुरुवात व्हायची. गावातील स्रिया घरातली कामंं आटोपून आपापल्या शेजार बेठारात पारंंपारीक खेळ व गाण्यांंचा कार्यक्रम रंंगवायच्या. म्हातार्‍या आज्या पारंंपारीक गीतांंतुन आपली संंस्कृृती सांंगायच्या. स्रिया व मुली पारंंपारीक खेळांंचा फेर धरायच्या. माझी आजी "बायाबायी " पारंंपारीक गीतांंचा चालताबोलता खजीनाच होता. शिमग्यातील पारंंपारीक खेळ इतर दिवसात खेळले जात नसल्याने आमच्यासाठी ही पर्वणीच असायची. शिमगा म्हणजे जीव की प्राण. एकदाचे जेवण नाही मिळाले तरी चालेल पण खेळ सुटायला नको हीच सर्वांंची भावना असायची. खेळाच्या नादात मध्यरात्र कधी उलटुन जायची कुणालाच कळायचे नाही. घरातली मंंडळी रात्रीउशीरापर्यंंत खेळायला विरोध करायची. पण त्याची फिकीर होती कुणाला ?

शिमग्याच्या शेवटच्या टप्प्यात होळीच्या आदल्या दिवशी कुणा एकाचा बैल किंंवा गोरा सजवून गावात नंंदि काढला जायचा. सोबत एखादा पुरुष साडी घालुन सोंंग आणायचा. सोबत " महादेवाले जातो गा " चा गजर सुरु असायचा. गावात प्रत्येक घरी जावून ऐच्छिक वर्गणी नंंदिच्या आरतीत टाकली जायची. या वर्गनीतून नंंतर नाष्ट्याचा बेत केला जायचा. होळीच्या दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी पेटत्या होळीत शेणाचे वडे भाजुन धुळवडीला सुरुवात व्हायची. हा सण आजही सितेपारात त्याच उत्साहाने साजरा होतो. फरक एवढाच पडलाय....... काळ बदलला तसे पारंंपारीक खेळ व पारंंपारीक गाणी काळाच्या पडद्याआड गेले.............गुलाब बिसेन ( ९४०४२३५१९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा