वणवा आणि ते तिघं
००० वणवा आणि ते तिघंं ०००
दुपारची वेळ ..... डोक्यावर तापणारा सूर्य आग ओकत होता. अशा दुपारी मी सकाळची शाळा आटोपून घरी येत होतो. वळणावळणाच्या रस्त्याने मी चाललो होतो. खींंडीत पोचताच मला रस्त्याच्या डाव्या बाजुला धुराचे लोट वाहताना दिसले. जवळ गेल्यावर लक्षात आलंं की हि आग शेतकर्यांंनी लावलीय. दरवर्षी शेतकरी रानातील गवत कापून झाले की , पुढच्यावर्षी गवत चांंगले यावे यासाठी गवताच्या राहीलेल्या खुंंट्या पेटवतात. अशीच कुणीतरी ही आग लावली होती. दुपारच्या कडक उन्हाने वाळलेल्या गवताच्या खुंंट्या प्रचंंड वेगाने पेटत होत्या. वाटेत येईल त्याची राख करण्याची स्पर्धाच जणुसुरू होती. तु पुढंं की मी अशा त्वेशाने वणवा वार्याच्या साथीने पुढे पुढे येईल त्याला गिळंंकृृत करत चालला होता.
असा वणवा या दिवसात सगळीकडेच लावला जात असल्याने याकडे कुणाचेच हक्ष नव्हते. याच शेताच्या एका टोकाला रस्त्यापासून पन्नासेक फुटावर विज वितरण विभागाचे ट्रांंसफार्मर होते. या ट्रांंसफार्मरच्या खालचे व सभोवतीचे गवत तसेच होते. कदाचीत सुरक्षिततेच्या कारणास्तव शेतकर्याने कापले नसावे. वार्यामुळे वाळलेल्या गवताकडे वणवा धाव घेत होता. बघता बघता हा वणवा ट्रांंसफार्मरच्या अगदि जवळ जावून पोचला. क्षणार्धात वणवा ट्रांंसफार्मरला गिळंंकृृत करेल . एवढ्यात रस्त्याने जाणार्या तिघा तरूणांंच्या हा प्रकार लक्षात येताच , त्यांंनी पुढिल धोका ओळखुन क्षणाचाही विलंंब न लावता रस्त्याकडेला गाड्या लावून डोंंगरात धाव घेतली. हिरव्या झुडपांंतून फांंद्या तोडुन आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. थोड्या वेळाने आग विझवण्यात त्याना यश आलंं.
या तीन तरूणांंच्या सतर्कतेने सार्वजनिक मालमत्तेची होणारी हानी टळली . परंंतु या वणव्याने असंंख्य तृृणभक्षी प्राण्यांंचे , गवतात राहणार्या पक्ष्यांंचे संंसार उध्वस्त केले. नुकतीच पावसाळ्यात बिजांंकुर होवून बाळसंं धरलेली कोवळी झाडे नष्ट झाली. लावर्या , ससे यांंसारख्या असंंख्य जीवांंनाआपली घरे सोडुन पळ काढावा लागला. हा वणवा दरवर्षी असंंख्य जीवांंचे संंसार उध्वस्त करत असाच रानोमाळ फिरत असतो............... गुलाब बिसेन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा