मी एक छंदीफंदी

 मी एक छंदीफंदी


मित्रांनो हि दुनिया अतरंगी आहे. जो ज्या नजरेनं बघतो  त्याला दुनिया तशी दिसते. या अतरंगी दुनियेत छंदीफंदी लोकही बरेच आहेत. प्रत्येक माणसाला कुठला न कुठला छंद असतोच असतो. त्यामुळे छंदीफंदी माणसांच्या समुहाचा मी स्वत:ला एक सदस्यच समजतो. तसं मी हे सदस्यत्व स्वत:च स्वत:ला बहाल करून टाकलंय. छंद हा कलेचा एक रूप असावा असे मला वाटते. 


मी डी. एड. ला असताना फावल्या वेळेत वर्तमानपत्रातील कविता, गाणी, चारोळ्या संकलीत करण्याचा छंद लागला. सुरूवातीला कविता, चारोळ्या वहित लिहून ठेवत होतो. पुढे पुढे लिहायचा कंटाळा येत गेला आणि हे संकलन थांबलं. कालांतराने माझं लक्ष वर्तमानपत्रात प्रकाशित होणार्‍या खेळाडुंच्या फोटोंवर गेलं. आधिच मी क्रिकेटचा दिवाणा. त्यात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, स्टिव वाॅ, ब्रेट ली, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग अशा वर्ल्ड फेमस क्रिकेटर्सचे फोटो मला भूरळ घालू लागले. त्यामुळे मी वर्तमानपत्राच्या रद्दितून हे फोटो कापून वहीत चिकटवू लागलो.


वर्तमानपत्र, कात्री आणि डिंकाचा हा खेळ रोजचे रोज वाढत गेला. जेव्हाही मोकळा वेळ मिळेल तेव्हा वर्तमानपत्र घेऊन, त्यातील एखादा सुंदर फोटो कापावा आणि वहित चिकटवावा. हे नित्याचेच होवून गेले. या छंदामुळे पेपरची रद्दीमात्र पार वैतागुन गेली. रद्दीवाल्याने ती उघडून बघितली असती तर कदाचीत "तुम्हीच ठेवा रद्दी" असे म्हणत रद्दी घेण्यास नकारच दिला असता. परंतु मी रद्दी विकताना खबरदारी घेतल्याने तसी वेळ कधी आली नाही. असा हा माझा छंदाचा प्रवास सुरू आहे.


<<<<<------- गुलाब बिसेन


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा