आनंदाचे क्षण पेरणारे माझे विद्यार्थी

००० आनंंदाचे क्षण पेरणारे माझे विद्यार्थी ०००

दि. १० मार्चे २०१७ ( शुक्रवार ) . माझ्या आयुष्यातील काही खास दिवसांंतील एक. हा दिवस खास केला तो माझ्या आजी - माजी विद्यार्थ्यांंनी. चांंगले शिक्षक मिळणे ही विद्यार्थ्यांंसाठी भाग्याची गोष्ट मानली जाते. कारण गुरू जिवनप्रवास सुकर करण्याची उर्जा देतो. तसेच चांंगले विद्यार्थी मिळणंं हेही भाग्याचेच असते.

१० मार्च ला माझा एकतीसावा वाढदिवस. त्यामुळे सकाळपासूनच मोबाईल , व्हाॅॅट्सअॅॅप , फेसबूकवर शुभेच्छा संंदेशांंची रेलचेल सुरु होती. मित्रांंकडुन शुभेच्छांंचा वर्षाव सुरु होता. असे असले तरी हा भाग फक्त शुभेच्छा देण्यापर्यंंतच मर्यादित होता. माझा वाढदिवस कार्यक्रम घेवून कधीही साजरा झाला नाही आणि कुणी केलाही नाही. माझ्या बालपणी तशी पद्धतही नव्हती. वाढदिवस यायचे तसे निघुन जायचे. परंंतु एकतीसावा वाढदिवस या सर्वांंना अपवाद ठरला आणि तो अपवाद ठरवला माझ्या विद्यार्थ्यांंनी.

त्यादिवशी मी नेहमीप्रमाने शाळेत गेलो. गावच्या प्रवेशावरच काॅॅलेजला असलेल्या माझ्या माजी विद्यार्थ्यांंनी मला थांंबवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तोपर्यंंत मी शाळेला आल्याचे समजताच शाळेतील सर्व विद्यार्थी रस्त्यावर येवून माझी वाट बघु लागले. मी शाळेच्या गेटजवळ येताच शुभेच्छा द्यायला मुलांंच्यात चढाओढ सुरु झाली. यातच काही मुलांंनी फटाक्यांंची आतषबाजी केली. चिमुकल्यांंनी ताशा बडवायला सुरुवात केली. ताशाचा गजर आणि मुलांंचा गलका घेवूनच मी शाळेत प्रवेश केला. असा विद्यार्थ्यांंचा उत्साह मी आयुष्यात पहिल्यांंदाच अनुभवत असल्याने अक्षरश: भारावून गेलो. शाळेत येताच परत फटाक्यांंच्या फैरी झडल्या. परिपाठ झाल्यावर विद्यार्थ्यांंनी आणलेला केक कापूण माझा वाढदिवस साजरा झाला. मीही विद्यार्थ्यांंना रिटर्ण गिफ्ट दिले.

दुपारच्या सुट्टित माझ्या माजी विद्यार्थ्यांंनी केक आणला. हा केक भरवून सर्वांंनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. माझ्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांंनी माझ्यावर दाखवलेले प्रेम कुठल्याही मापानंं न मोजता येणारे असेच ! माझ्या आयुष्यात आनंंदाचे क्षण पेरणार्‍या माझ्या सर्व आजी - माजी विद्यार्थ्यांंचे  मनपूर्वक धन्यवाद .................गुलाब बिसेन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा