या चिमण्यांनो

००० या चिमण्यांंनो....... ०००

चिमणी हा इवलासा पक्षी. लहानपणी घरी केलेल्या घरट्यातून हळुच बाहेर डोकवायची आणि अंंगणातील दाने वेचुण आपल्या पिलांंना भरवायची.हे दृृश्य बघताना मन हरकुन जायचंं. पिलांंचा चिवचीवाट ऐकल्याशीवाय दिवसाची सुरुवातच व्हायची नाही. कधी कधी घरट्यातून चिमणीची अंंडी खाली पडुन फुटायची. ही फुटलेली अंंडी मनाला क्लेश द्यायची.....

आता सिमेंंची जंंगले चिमण्याचा निवारा हिरावताना बघुन क्लेश होतोय... या चिमण्यांंना जगवण्याची , त्यांंना सुरक्षित निवारा .... पोटभर अन्न..पाणीदेण्याची गरज ओळखुन...... हे बालमनावर रुजवण्यासाठी काही दिवसांंपूर्वी आमच्या शाळेत मी मुलांंच्या मदतीने पक्ष्यांंसाठी पाणपोयी उभारली....झाडावर स्वंंच्छंंद विहार करणार्‍या चिमण्यांंनी सुरूवातीला पाणपोयीकडे पाठ फिरवली. पाणपोयी त्यांंची हक्काची आहे हे समजल्यावर त्या हळुहळु याकडे वळल्या. पाण्याबरोबर त्यांंचा पोटाचा प्रश्न मिटावा यासाठी अन्नाची सोय केली गेली.......त्याचाही  आस्वाद आता चिमण्या घेताहेत. एकाच ठिकाणी अन्न , पाणी व सुरक्षित निवार्‍याची सोय आम्हाला करता आली..... याचे समाधान वाटते..... आमचा हा छोटासा प्रयत्न निदान चार आठ चिमण्यांंचा संंसार नक्की फुलवेल.............गुलाब रमेश बिसेन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा