श्रमसंस्कार

००० श्रमसंंस्कार ०००

मी नेहमीप्रमाने शाळेत गेलो. मुलांंना किल्या देत वर्ग उघडून घेतले. सर्व मुले आपापल्या कामाला लागली. ठरल्याप्रमाणे कुणी वर्ग स्वच्छता, कुणी मैदान स्वच्छता , कुणी बागेला पाणी , कुणी फळ्यावर परीपाठ लिहु लागले. सर्व कामकाज व्यवस्थित सुरू होते. थंंडी असल्याने मी उन्हाचा आसरा घेत बागेच्या कट्यावर बसलो. इयत्ता ५ वीच्या दोन मुली मैदान लोटत होती. संंपूर्ण मैदानात फरशी बसवली असल्याने , हे काम मुले आनंंदात करुत होती. एवढ्यात मला मैदानात मध्यभागी कुत्र्याने शी केलेली दिसली. मी मुलींंना ती शी काढण्याच्या सूचना दिल्या. मुलींंनी मान  हलवत होकार दिला. मी वर्तमानपत्र वाचत बसलो. चार पाच मिनीटांंनी मी मैदानाकडे बघितल्यावर मला ती घान होती तिथेच दिसली. मुली घाण तशीच ठेवून लोटत पुढे गेल्या होत्या. मी मुलींंना परत घाण उचलण्याची सूचना केली. मुलींंनी परत मान हलवत होकार दिला. मी परत पेपर वाचु लागलो. परत पाच मिनीटांंनी मैदानाकडे बघितल्यावर मला ती घाण तशीच दिसली. आता त्या दोन मुली आपापसात कुजबूजु लागल्या. दोघीत घाण कुणी काढायची यावर त्याच्याती एकमत होईना. हा प्रकार माझ्या लक्षात येताच , मी कट्ट्यावरून उठुन तडक झाडणार्‍या मुलींंकडे गेलो. त्यांंना काहीही न बोलता मी एका मुलीच्या हातातील झाडु घेत व दुसर्‍या हातात सुप घेत मी ती घाण उचलु लागलो.

अचानक घडलेल्या या प्रकाराने झाडणार्‍या मुली व शाळेतील इतर मुले काहीशी भांंबावली. झाडणार्‍या मुलींंनी मान खाली घालत माझ्या हातातील झाडु मागुन घेतला. माझे घाण उचलने त्यांंच्या मनाला चांंगलेच लागले असावे. तोपर्यंंत मी घाण उचलुन लांंब टाकली होती. शाळेतील सर्व मुले हा प्रकार बघत होते. आपले काम आपण प्रामाणीकपणे न केल्याने सरांंना घान उचलावी लागली . या विचाराने या मुली काहीशा घाबरल्या. सर आपल्याला शिक्षा करतील असे त्यांंना वाटले असावे. त्यांंचे संंपूर्ण काम संंपल्यावर मी त्यांंना जवळ बोलावून घेतले आणि कोणतेही काम हे कमीपणाचे नसते. कामाची लाज नसणाराच जिवनात यशस्वी होवू शकतो असे सांंगीतले. माझे म्हणने त्या दोघींंबरोबर इतर मुलांंनाही पटले. या प्रसंंगानतर शाळेच्या आवारातील घाण काढायला मुलांंना सांंगावे लागले नाही.................गुलाब रमेश बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा